शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 6:25 PM

गेला महिनाभर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा शहरात सुरू आहे. बाहेरचा उमेदवार लादू नका असा ठरावही एकदोन वेळा करून झाला आहे.

ठळक मुद्देप्रचाराच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची बैठकमोहन जोशी, अरविंद शिंदे हे इच्छुक

पुणे : उमेदवारी कोणाला द्यावी हे आपण पक्षाला सुचवले आहे, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे आता पक्षाने कोणीही उमेदवार देऊ द्या, आपण त्याचे काम जोरात करू असा निर्धार काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी काँग्रेसभवनमध्ये करण्यात आला. पदफेऱ्या, चौकसभा, मोठ्या सभा यांचे नियोजन बैठकीत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे हे इच्छुक तसेच शहराध्यक्ष रमेश बागवे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, नगरसेवक अजित दरेकर व अन्य काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. गेला महिनाभर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा शहरात सुरू आहे. बाहेरचा उमेदवार लादू नका असा ठरावही एकदोन वेळा करून झाला आहे. पत्रक तर कितीतरी प्रसिद्ध केली आहेत. थेट पक्षाध्यक्षांनाही तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत. अनेकांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून सातत्याने घेतली जात आहेत व लगेचच त्याला विरोधही जाहीरपणे केला जात आहे.या सगळ्याची दखल शहराध्यक्ष बागवे यांनी घेतली. ते म्हणाले, सत्ताधारी भाजपा त्यांच्या पक्षात काँग्रेससह अनेक पक्षांमधील उमेदवार घेत आहे. याचे कारण त्यांना जागा महत्वाच्या वाटतात. आपल्या पक्षालाही तसे वाटले तर त्यात गैर काहीच नाही. जाहीर पत्रके, बैठकांमधील मतभेदांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचली तर त्यातून पक्षाची हानी होते. मतदारांमध्ये पक्षाबाबत गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे आता आपण आपली मते स्पष्टपणे पक्षाला कळवली आहेत. आता पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम आपण करणे गरजेचे आहे. पक्षाला विजय मिळणे महत्वाचे आहे.अन्य पदाधिकाऱ्यांनीही भाषणात असेच मत व्यक्त केले. शहरातील महत्वाच्या ठिकाणांची चर्चा यावेळी झाली. काँग्रेसचे मतदान कुठे आहे तिथे संपर्क करण्याच्या जबाबदाऱ्या काही ज्येष्ठांवर सोपवण्यात आल्या. निवडणूक आचारसंहितेबाबतचे सर्व काम, चौक सभांचे नियोजन, वक्त्यांची यादी, मोठ्या सभांची संभाव्य ठिकाणे याबाबतही चर्चा करण्यात आली. येत्या एकदोन दिवसात उमेदवार जाहीर होईल, त्यापूर्वी सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्याच्या सुचना बागवे यांनी दिल्या. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी