शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हॉकी संघाला देशी प्रशिक्षक द्या - धनराज पिल्ले

By admin | Updated: June 21, 2014 23:42 IST

भारतातील हॉकी खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे.

इस्लामपूर : भारतातील हॉकी खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. हॉकीमधील भारताचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, तर हॉकी महासंघाने भारतीय हॉकी प्रशिक्षक नेमावेत, अशी मागणी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी शनिवारी येथे केली. संदीप बत्रा हे हॉकी महासंघाचे हुकूमशहा बनले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.येथे प्रा. चंद्रकांत कळसकर या क्रीडा प्रशिक्षकाचा गौरव सोहळ्यासाठी आल्यानंतर पिल्ले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिल्ले म्हणाले की, देशाला ऑलिंपिक, आशियाई यासह अन्य आंतराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून पदकांची अपेक्षा असेल तर पहिल्यांदा सर्व खेळांतील पायाभूत सुविधा, व्यवस्था भक्कम करायला हव्यात. हॉकी खेळाडूंना अद्ययावत आणि प्रगत प्रशिक्षणाची गरज आहे. त्यासाठी स्वत: मैदानावर काही काळ खेळलेला देशातीलच खेळाडू प्रशिक्षक असायला हवा. पुस्तकी शिक्षण घेतलेला प्रशिक्षक अजिबात नियुक्त केला जाऊ नये. परदेशी प्रशिक्षकांनी भारतीय हॉकी संघाचा दर्जा उंचावण्याऐवजी तो कमी करण्याचे काम केले आहे. नुकत्याच झालेल्या विश्वकप हॉकीत भारताचा संघ नवव्या स्थानावर फेकला गेला, ही विदेशी प्रशिक्षकाची मिळालेली देणगी आहे. त्यांच्यावर लाखो रुपये उधळण्याचे काम हॉकी महासंघाने थांबवायला हवे. मेजर ध्यानचंद, मोहंमद शहीद यासारखे खेळाडू घडवणारे प्रशिक्षक भारतीयच होते. भारताचे लोक परदेशात सीईओ म्हणून काम पाहतात आणि भारतीय हॉकीची सीईओ मात्र एक ऑस्ट्रेलियन महिला आहे.विदेशी प्रशिक्षक असला तर राजकारण होत नाही, असे हॉकी महासंघाचे प्रमुख संदीप बत्रा म्हणतात; हे साफ चुकीचे आहे. मग आंतरराष्ट्रीय स्पर्धात सर्वाधिक गोल नोंदवणार्‍या संदीपसिंगला विश्वकप खेळणार्‍या संघातून का वगळले, याचे उत्तर बत्रा यांनी द्यावे अशी मागणी पिल्ले यांनी केली. हॉकी लिगसारख्या संकल्पना खेळाडूंसाठी चांगल्या आहेत. पाि›मात्यांचे अनुकरण न करता प्रशिक्षणात सुधारणा झाल्या पाहिजेत. देशासाठी खेळण्याची उर्मी प्रत्येक खेळाडूत निर्माण व्हायला हवी आणि ते काम फक्त देशी प्रशिक्षकच करू शकतो, असेही पिल्ले म्हणाले.देशासाठी १६-१७ वर्षे खेळणारा मी एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे मी भारताच्या हॉकी संघाचा प्रशिक्षक होण्यास तयार आहे. मात्र मी हॉकी महासंघाच्या हातचे बाहुले बनणार नाही. त्यामुळे ते मला बोलावतील, असे वाटत नाही. मात्र जर बोलावणे आलेच तर देशाच्या हॉकीला गतवैभव मिळवून देण्याच्या मी प्रतीक्षेत आहे, असेही शेवटी पिल्ले यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्रा. वीरसेन पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, संजय कोरे, राष्ट्रीय खेळाडू संदीप कदम उपस्थित होते. (वार्ताहर)