शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजीचे पैसे वेळेवर देऊ : पीएमपीचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:49 IST

‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे ११५० बस सीएनजीवर धावतात. या बससाठी ‘एमएनजीएल’कडून गॅस पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देएमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकदरदिवशी ३० लाख रुपये व महिन्याला सुमारे १० कोटी रुपये बिल

पुणे : कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे आतापर्यंत थकित बील पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) दिले असून यापुढील पैसेही वेळेवर देण्याचे आश्वासन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ला सोमवारी दिले. मात्र, पैसे थकल्यानंतर पुन्हा गॅस पुरवठा बंदची टांगती तलवार ‘पीएमपी’वर राहणार आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे ११५० बस सीएनजीवर धावतात. या बससाठी ‘एमएनजीएल’कडून गॅस पुरवठा केला जातो. बसला दररोज सुमारे ६० हजार किलो गॅस लागतो. त्याचे दरदिवशी ३० लाख रुपये व महिन्याला सुमारे १० कोटी रुपये बिल होते. मात्र, मागील काही वर्षात पीएमपीकडून कंपनीला वेळेवर पैसे दिले नाहीत. त्यामुळे थकबाकी सुमारे ४७ कोटी रुपयांपर्यंत वाढत गेली. त्यामुळे व्याज व जीएसटीचे सुमारे २१ कोटी रुपयांचा समावेश आहे. यापार्श्वभुमीवर मागील आठवड्यात ‘एमएनजीएल’ने गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तातडीने हालचाली होऊन पीएमपीकडून २७ कोटी रुपये कंपनीला दिले. त्यामुळे गॅसपुरवठा बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.‘एमएनजीएल’कडून उचललेल्या टोकाच्या पावलामुळे पीएमपी प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. सोमवारी यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाºयांची पीएमपी कार्यालयात बैठक झाली. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, एमएनजीएलचे वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के आदी या बैठकीला उपस्थित होते. सीएनजी बिलासह थकित रकमेवरील व्याज व जीएसटीवर चर्चा झाली. बिल न थकविता वेळेवर रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीला देण्यात आले आहे. तसेच व्याज व जीएसटीवर वित्त विभागातील अधिकारी एकत्र बसून तोडगा काढणार आहेत. वेळेवर पैसे मिळाले नाहीत, तर त्याबाबत त्यावेळी निर्णय घेऊ, असे सोनटक्के यांनी सांगितले. नयना गुंडे यांनीही याला दुजोरा दिला.  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे