सिंधूताई सपकाळ यांना भारतरत्न द्या : काळकुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:04+5:302021-02-05T05:07:04+5:30
या वेळी ते म्हणाले की, भेट देणे हे केवळ औचित्य आहे. पण, मला जो आनंद मिळाला आहे तो शब्दात ...

सिंधूताई सपकाळ यांना भारतरत्न द्या : काळकुटे
या वेळी ते म्हणाले की, भेट देणे हे केवळ औचित्य आहे. पण, मला जो आनंद मिळाला आहे तो शब्दात मांडणे कठीण आहे. सिंधूताई यांचे काम फार मोठे आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. परंतु माझी सरकारला आशी मागणी आहे की त्यांचे एवढे मोठे काम आहे, त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. येथून पुढे मला जे शक्य होईल तेवढी मदत मी आश्रमाला करणार आहे.
यावेळी नायगावचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कड, माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर, मुख्याध्यापक विठ्ठल कदम,रुग्णसेवक दुर्वा दळवी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गंभीरे, दादासाहेब बेंद्रे, संजय शेंडगे तसेच दीपक गायकवाड, स्मिता पानसरे, संजय गायकवाड, मंजुषा गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : कुंभारवळण (ता.पुरंदर) येथे उपस्थित मान्यवर व विद्यार्थी