शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढाईत मोलाची मदत करणाऱ्या रतन टाटा यांना भारतरत्न द्या;पिंपरी महापालिकेच्या सभेत ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 18:49 IST

देशावर ज्यावेळी संकट येईल, त्यावेळी रतन टाटा मदतीसाठी सरसावले आहेत.

ठळक मुद्देपिंपरी - चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा हा मोठा उद्योग समूह

पिंपरी : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल १ हजार ५०० कोटींची मदत केली आहे. देशावर ज्यावेळी संकट येईल, त्यावेळी ते मदतीसाठी सरसावले आहेत. पिंपरी - चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा हा मोठा उद्योग समूह आहे. त्यामुळे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव महापालिका महासभेत पारित केला असून राज्य आणि केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे.

पिंपरी - चिंचवड महापालिकेची तहवूष्ठब सभा झाली. या सभेत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव उपसूचनेद्वारे करण्यात आला. उपमहापौर तुषार हिंगे यांनी मांडलेल्या या उपसूचनेला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या उपसूचनेला एकमताने मान्यता देण्यात आली. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल १ हजार ५०० कोटींची मदत केली आहे. शिवाय मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणाठया वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करुन दिले. पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भरीव अशी मदत केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देशावर ज्या-ज्या वेळी संकटे आली अशा वेळेस सर्वतोपरी मदत केली आहे.टाटा उद्योग समूह हा पिंपरी - चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा मोठा उद्योग समूह आहे. टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून शहरातील अनेक तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. राज्य, केंद्र सरकारकडे यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेRatan Tataरतन टाटाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायshravan hardikarश्रावण हर्डिकर