मुलींचा शिक्षणातील टक्का वाढतोय
By Admin | Updated: March 8, 2015 01:16 IST2015-03-08T01:16:17+5:302015-03-08T01:16:17+5:30
शिक्षण घेण्याबाबत मुलींमध्ये निर्माण झालेली आवड, अशा विविध कारणांमुळे मुलींचा शिक्षण क्षेत्रातील टक्का वाढत चालला आहे.

मुलींचा शिक्षणातील टक्का वाढतोय
पुणे : समाजामध्ये शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती,
मुलींच्या शिक्षणासाठी शासन व सामाजिक स्तरावर केले जात असलेले विविध प्रयत्न आणि शिक्षण घेण्याबाबत मुलींमध्ये निर्माण झालेली आवड, अशा विविध कारणांमुळे मुलींचा शिक्षण
क्षेत्रातील टक्का वाढत चालला आहे. त्यात इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १३ हजाराने वाढली आहे.
गेल्या काही वर्षांपासून दहावी- बारावीच्या निकालामध्ये मुलींचीच सरशी राहिली आहे. त्यात यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या चांगलीच वाढली आहे, याबाबत अधिक माहिती देताना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून शासनातर्फे मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच शालाबाह्य मुलींना शाळेत प्रवेश देण्याचे काम केले जात आहे.
दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून अनेक व्यक्ती व संस्था मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहेत. मुलींना शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव पालकांना झाली आहे. मुली अभ्यासाबाबत मुलांपेक्षा अधिक गंभीर असतात. त्यामुळे इयत्ता नववीमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे.
यंदा राज्यातील १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, त्यात ९ लाख ५९ हजार ४५० मुलांचा आणि ७ लाख ७३ हजार ४४८ मुलींचा समावेश आहे. मार्च २००९ मध्ये परीक्षा देण्यासाठी प्रविष्ट झालेल्या नियमित मुलींची संख्या ६ लाख ५७ हजार १८१ होती. त्यामुळे दिवसेंदिवस दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या नियमित मुलींची संख्या
वर्षमुलींची संख्यानिकालाची
टक्केवारी
२००९६,५७,१८१८४.८०
२०१०६,६५,९६०८५.००
२०११६,७९,०६६७७.५४
२०१२ ६,९१,१४०८२,९६
२०१३६,९७,४३२८४,९०
२०१४७,०३,०२३९०.५५