शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मुलींनी बांधल्या पोलिसांना राख्या, नाते सामाजिक बांधिलकीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:42 IST

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व

वाकड : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाºयांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले. थेरगाव येथील प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रज्ञा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वाकड पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राखी बांधण्यामध्ये वैष्णवी साळवे, पल्लवी मिसळे, स्वाती गरडे, मनाली भालेराव, कार्ती साळवे, काजल चव्हाण, राणी गोडाबे, वैशाली राठोड, वर्षा फुलावळे, पूनम कदम, देवतीन गायकवाड, कांचन साळवे, गोरी कांबळे, सपना पवार या विद्यार्थिनींचा सहभाग होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, सहायक निरीक्षक तानाजी भोगम, उपनिरीक्षक रमेश केंगार यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व संस्थेचे खजिनदार बुद्धभूषण गवळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, सहशिक्षिका मंगला सपकाळे, चंद्रकला काळोखे, संगीता रोकडे, प्रज्ञा सोनवणे यांनी नियोजन केले. राखी बांधल्यानंतर पोलीस काकांनी सर्व विद्यार्थिंनीना भेट म्हणून खाऊचे वाटप केले.

जवानांना बांधल्या राख्यापिंपळे गुरव : देवकर पथ, येथील एम. जी. देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचालित ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये बालचमूंनी जवानांनसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. एक सामाजिक उपक्रम व सैनिकांच्या प्रती आपले ऋण व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिकांतर्फे हजर असलेले प्रतिनिधी मेजर रावसाहेब ढोले व मेजर प्रमोद काळे यांना औक्षण केले. नंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कावेरी सावंत व ममता चौधरी या विद्यार्थिनींनी बांधल्या़ यामुळे मुले भारावून गेली.

सीमेवरील जवानांनमुळे आज संपूर्ण देश सुरक्षित आहे़ आपत्कालीन परिस्थितीत देशवासीयांसाठी जवानांचे योगदान खूप मोठे आहे़ त्यामुळेच जवान तुझे सलाम....असे मनोगत माधुरी बांद्रे यांनी व्यक्त केले. मेजर रावसाहेब ढोले यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक प्रकारची स्फूर्ती येते. देशातील आमच्या भगिनी व देशवासीय आमच्या बरोबर असल्याचे वाटते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे व या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी शाळेतर्फे जवानांनसाठी या प्रतिनिधींकडे राख्या देण्यात आल्या. संस्थापक रामदास देवकर व शांताबाई देवकर यांच्या हस्ते या दोन्ही सैनिक प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी या सैनिक प्रतिनिधीचे आभार मानले. या वेळी विविध संस्थांच्या वतीने वाहतूक पोलिसांना राख्या बांधण्यात आल्या. तसेच विविध शाळांंमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रमही झाला. काही शाळांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना औक्षण करून राख्या बांधल्या. या वेळी रक्षाबंधनाचे महत्व सांगण्यात आले. शाळेत असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेRakhiराखीPoliceपोलिस