शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्टयाने गळा आवळून खून; आरोपीचा जामीन फेटाळला

By नम्रता फडणीस | Updated: April 11, 2024 17:41 IST

महिलेने मुलीसोबतचे संबंध तोडण्यासह पुन्हा घरी न येण्याचे आरोपीला बजावले होते

पुणे : मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत् तसेच घरी येऊ नये असे ठणकावून सांगितल्याचा राग मनात धरुन प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्ट्याने गळा घोटणार्‍या तरूणाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांच्या न्यायालयाने फेटाळला. शिवांशू दयाराम गुप्ता (वय 23, रा. प्रतिकनगर, येरवडा) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. 18 जानेवारी 2024 रोजी पाषाण परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, 58 वर्षीय महिलेच्या मुलीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेची 22 वर्षीय मुलगी व आरोपी यांचे प्रेमसंबंध होते.

गुप्ता  हा खुनशी प्रवृत्तीचा असल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले. यादरम्यान, त्याने प्रेयसी काम करत असलेल्या कंपनीमध्ये मेलद्वारे प्रेयसीची बदनामी केली. परिणामी, तिला कंपनीचा राजीनामा द्यावा लागला. त्या रागातून  आरोपीने 58 वर्षीय महिलेला हाताने तसेच घरातील कुत्र्याला बांधण्याकरिता असलेल्या गळ्यातील पट्ट्याने गळा आवळून जीवे ठार मारले आणि  मोबाईल घेऊन गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात, बचावपक्षातर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. घटनेच्या दिवशी आरोपीच्या घरी येतानाचे व गुन्हा करून परत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. संपूर्ण कालावधी हा 30 मिनिटांचा असल्याने गुप्ता हा खूनाच्या उद्देशानेच आल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या दोर्‍याने आरोपीने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला तो दोरा आरोपीच्या घरात मिळून आल्यानेत्याचा गुन्ह्याशी संबंध असल्याचे दिसून येते. महिलेने गुप्ता याला मुलीसोबतचे संबंध तोडण्यासह पुन्हा घरी न येण्याचे बजावले होते. त्याचा राग आरोपीच्या मनात होता, असा युक्तिवाद अ‍ॅड. अगरवाल यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयDeathमृत्यू