शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी मृत्युमुखी, सोबतची मैत्रीण धक्क्याने बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 01:34 IST

भरधाव वेगात मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मिक्सर डंपरची धडक बसून आर्किटेक्ट विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आपल्यासमोरच मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचे पाहून दुसरी तरुणी धक्क्याने बेशुद्धावस्थेत आहे.

मुंढवा - भरधाव वेगात मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मिक्सर डंपरची धडक बसून आर्किटेक्ट विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आपल्यासमोरच मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचे पाहून दुसरी तरुणी धक्क्याने बेशुद्धावस्थेत आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. प्राची सतीश भुजबळ (वय २२, रा. अ‍ॅमनोरा टॉवर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आर्किटेक्चर कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिकत होती. प्राची ही तिची मैत्रीण श्रुतिका विकास शिंदे (वय २०, रा. हडपसर) हिच्यासह दुचाकीवरून कोरेगाव पार्कहून मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावरून हडपसरकडे जात होत्या. याच पुलावर पाठीमागून आलेल्या भरधाव डंपर मिक्सरची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. प्राची दुचाकीवरून खाली पडून ती डंपरच्या टायरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. श्रुतिका गाडी चालवित होती. यात ती सुदैवाने बचावली. या घटनेनंतर या डंपरचा (मिक्सरचा) चालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला.एकुलती एक मुलगी अचानक गेलीसणसवाडीच्या जवळच राहणारे हे भुजबळ कुटुंब, परंतु व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यातील हडपसर भागात अ‍ॅमनोरा टॉवर येथे स्थावर झालेले. प्राचीला एक भाऊ आहे. अत्यंत हुशार आणि अनेकविध कलांची आवड तिला होती. ती आर्किटेक्चरला चौथ्या वर्षात शिकत होती.मुंढव्यात अपघातांची मालिका सुरूचमुंढवा परिसरात दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. खराडी-हडपसर बायपास हा मार्ग मुंढव्यातून गेलेला आहे. या मार्गावर जड वाहने भरधाव वेगाने मार्गस्थ होत असतात. वाहनचालकांकडूनही शिस्तीचे पालन होताना दिसत नाही. या उड्डाणपुलावर येण्यासाठी मुख्य रस्त्यावरून तसेच उड्डाणपुलाखालून वाहनांची रिघ लागते. हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. या मार्गावर अनेक निरपराध जीवांचा बळी गेला आहे. जेव्हा रस्ते रिकामे असतात त्यावेळी शर्यत लागल्यासारखी वाहनचालक आपली वाहने पळवत असतात. येथील महात्मा फुले चौकात तर पादचाºयांना, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे. अशा वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याची गरज आहे. तसेच या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येथे वारंवार अपघाताचे सत्र सुरूच असते. वाहतूक विभागाने अशा बेदरकारपणे वाहने चालविणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे