शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक घटना! बारामतीत युवतीवर चाकूने हल्ला; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 15:18 IST

हल्ल्यामध्ये युवतीच्या बोटाला दुखापत झाली असून हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

बारामती: बारामती शहरातील एका खासगी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या युवतीवर तरूणाने चाकूने हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये युवतीच्या बोटाला दुखापत झाली असून हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

बारामती येथील नीरा डावा कालव्या शेजारी असणाऱ्या पूर्वा कॉर्नर कॉम्प्लेक्समधील केसरी टूर्सच्या कार्यालयामध्ये मंगळवारी (दि. १८) सकाळी पर्यटनाचे बुकिंग घेणाऱ्या युवतीवर चाकू हल्ला करण्यात आला. हल्लेखोर तरूणाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मंगळवारी (दि. १८) सकाळी साडे दहा वाजता हे कार्यालय उघडल्यानंतर तरूणाने आतमध्ये प्रवेश केला. ‘मी सोमवारी कार्यालयात येवून गेलो, परंतु तुम्ही कार्यालय लवकर बंद केले’ असे म्हणत या युवकाने युवतीच्या गळ्यात हात घातला. आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरतोय की काय अशी शंका तिला आल्याने तिने त्याचा हात पकडला. माझा हात सोड, असे म्हणत हातावर चाकूचा वार करत हा युवक पळून गेला. घाईत चप्पल न घालताच तो दुचाकीवरून पसार झाला.

युवतीने कार्यालयाबाहेर येत त्याचा पाठलाग केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या हल्ल्यात युवतीच्या बोटाला चाकू लागून जखम झाली. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. दरम्यान सोमवारी सुद्धा या परिसरात हा युवक दोन तास येऊन बसल्याची माहिती पुढे येत आहे. या हल्ल्यात युवतीच्या एका बोटाला दुखापत झाली असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला