शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुलीने स्वतःचे अपहरण झाल्याचा मेसेज पाठवून कुटुंबियांना मागितले ५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:43 IST

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता अचानकपणे गायब झाली होती

शिक्रापूर : मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने स्वतःच्या मोबाईलवरून भावाच्या व्हाट्सअँपवर मेसेज करून ५ लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार शिक्रापूर तालुक्यात घडला आहे. पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता अचानकपणे गायब झाली होती. याबाबत शिक्रापूर पोलीस तपास करत होते. भावाच्या मोबाईलवर ''पाच लाख रुपये दया पैसे दिले नाहीतर तिचे जीवाचे काही खरे नाही'' असा मेसेज आल्यावर मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मुलीच्या अपहरणाची तक्रार दि .०४ नोव्हेंबरला नोंदविली होती.  शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली. मुलगी पुणे ते छापरा या रेल्वेने जात असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार बिहार राज्यातील छापरा रेल्वे पोलीस स्टेशनच्या स्थानिक पोलीसांची मदत घेऊन मुलीला ताब्यात घेण्यास कळविले. छापरा पोलिसांनी गुन्हयातील अल्पवयीन मुलीची ओळख पटवून तिला ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. मुलीकडे अधिक चौकशी केल्यावर मोबाईल वरून पाठवलेला खंडणी मागणारा मेसेज हा मुलीने स्वतःच पाठवून पाच लाख रूपये खंडणी मागण्याचा बनाव केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीत, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन यांचेसह पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर , पोलीस नाईक विकास पाटील , पो.ना. किरण निकम यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेKidnappingअपहरणPoliceपोलिसrailwayरेल्वे