शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 17:32 IST

शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे...

बारामती : लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता..तशी वधूकडची मंडळीत चुळबुळ सुरु झाली.. विशेष करुन मुलीच्या मैत्रिणी , नातेवाईक महिला यांचा काहीतरी प्लॅन सुरु असल्याची कुजबुज वऱ्हाडी मंडळींच्या कानावर पडली. पण नेमकं वधूपक्षात चाललंय तरी काय..थांगपत्ता काही केल्या लागेना.. इतक्यात मुहूर्त जवळ आल्यावर एकदम बुलेट गाड्यांचा आवाज येऊ लागला.. इंदापुर तालुक्यातील सणसर येथील शेतकऱ्याच्या मुलीची बुलेटवरुन लग्नमंडपात अवतरली.. आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अशा प्रकारे बुलेटवरुन काढलेली वरात परिसरात कुतुहलाचा विषय ठरली.. मुलीला दुचाकी चालविण्याची आवड आहे. विशेष तिला बुलेट चालविण्याचे मोठे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे. सणसर परिसरातील या वधुची संपुर्ण वरातच बुलेटवर काढण्यात आली.या वरातीमध्ये वधुसह २५ बुलेटस्वार सहभागी झाले होते. नातेवाईकांसह सणसरच्या ग्रामदैवताला फेरी मारुन वरात विवाहस्थळी पोहचली. प्रकाश विनायकराव निंबाळकर यांची ज्येष्ठ कन्या रेश्मा हिचा विवाह श्री क्षेत्र माहुली (तालुका आणि जि.सातारा )येथील नारायण आबाजी जाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव गौरव याच्यासमवेत भवानीनगर येथे श्री छत्रपती मंगल कार्यालयात पार पडला. मुलगी रेश्मा आर्किटेक्चर इंजिनिअर आहे. या विवाहासाठी सकाळपासूनच मित्र परिवार आणि नातेवाईक जमा झाले.  बॅन्ड-बाजा,ताशा,तुतारी सारख्या पारंपारीक वाद्याद्वारे यावेळी नातेवाईक मंडळींचे स्वागत सुरु  होते. यावेळी एकाच वेळी २५ बुलेटच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर नववधू  रेशमा चक्क फेटा बांधून, गॉगल लाऊन लग्न मंडपात दाखल झाली. यावेळी वधुसमवेत असणाºया इतर नातेवाईकांनी देखील पारंपारीक फेटे परीधान केले होते. त्यामुळे हि आगळीवेगळी वरात पाहुन अनेकांच्या  भुवया उंचावल्या. वधु म्हणजे लाजत, खाली मान घालुन मंडपात प्रवेश करते,हा बहुतांश  विवाहामधील अनुभव आहे.आज मात्र, नवरीबाईचा बुलेटवरील  थाट,आत्मविश्वास पाहुन अनेकांनी टाळ्या वाजवुन तिचे स्वागत केले.  मुलीचे चुलते जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, मुलगी म्हणजे दोन्ही घरांना जोडणारा दुवा असतो.तिच्या भावनांचा सन्मान राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आजच्या युगात मुलींच्या आवडीनिवडी महत्वपुर्ण आहेत.माझ्या पुतणीला सर्वच दुचाकी चालविण्याचे कसब आहे.बुलेटची तिला विशेष आवड आहे.त्यामुळे तिच्या विवाहानिमित्त पाठवणीची ही वरात आगळीवेगळी काढ्ण्याची संकल्पना आम्ही कुटुंबियांनी राबविली. 

टॅग्स :Indapurइंदापूरmarriageलग्नWomenमहिला