Girish Bapat's campaign: Before the speech of Javadekar, listeners are out | गिरीश बापट यांची प्रचारसभा :जावडेकर यांच्या भाषणाआधी श्रोते बाहेर
गिरीश बापट यांची प्रचारसभा :जावडेकर यांच्या भाषणाआधी श्रोते बाहेर

पुणे :पुण्यात भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रचारसभेत मुख्य वक्ते प्रकाश जावडेकर यांच्या भाषणाच्या आधीच अनेक श्रोत्यांनी बाहेरचा रस्ता धरल्याचे चित्र बघायला मिळाले.

संध्याकाळी 6 वाजता सुरु केलेल्या या सभेत जावडेकर यांचे भाषण सुरू झाले तेव्हा सुमारे साडेआठ वाजले होते. त्यांच्याआधी अनेक भाषणे झाले असल्याने श्रोत्यांनी विशेषतः महिला वर्गाने काढता पाय घेतल्याचे दिसून आले. भाजपच्या बाणेर बालेवाडी भागातील एका नगरसेवकाने काही नागरिक बसमधून सभेसाठी आणले होते. मात्र नागरिक उठल्यावरही संबंधित नगरसेवकाने नाईलाजाने नागरिकांना सभा संपण्यापूर्वी बसमधून लोकांना घरी सोडले.अर्थात खच्चून भरलेली सभा रिकामी होताना नगरसेवक आणि आमदारांची चलबिचल सुरू होती.अखेर बापट स्वतः उभे राहिल्यावर त्यांनीच वेळेचं भान राखत कमी बोलणार असे सुरुवातीला त्यांनी सांगितले.

यावेळी जावडेकर म्हणाले की, काँग्रेसला भारत माता की जय म्हणायला बंदी नाही पण ते म्हणत नाहीत.देशाला सुरक्षित राखेल ते फक्त नरेंद्र मोदी आहेत.त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची आहे.


Web Title: Girish Bapat's campaign: Before the speech of Javadekar, listeners are out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.