शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी जाहीर हाेताच गिरीश बापट यांचं भाजप कार्यलयात वाजत गाजत स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 13:49 IST

पुण्याच्या जागेवर भाजपाकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे वाजत गाजत स्वागत भाजप कार्यालयात करण्यात आले.

पुणे :  पुण्याच्या भाजपाच्या जागेवरुन काेणाला उमेदवारी जाहीर हाेणार, याची उत्सुकता असताना काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पुण्याच्या जागेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी बापट यांनी शिवाजी महाराजांच्या काेथरुड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपाच्या कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी वाजत गाजत बापट यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पुणे का नेता कैसा हाे गिरीश बापट जैसा हाे अशा घाेषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, महापाैर मुक्ता टिळक, उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे, आमदार जगदीश मुळीक, विजय काळे, माधुरी मिसाळ आदी उपस्थित हाेते. 

पुण्याच्या जागेवर भाजपाकडून अनेकजण उत्सुक हाेते. त्यात विद्यमान खासदार अनिल शिराेळे, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले त्याचबराेबर भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे हे देखील उत्सुक हाेते. काल रात्री जाहीर झालेल्या यादीत पुण्याच्या जागेवर बापट यांना उमेदवारी देण्यात आली. आज त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी माेठ्याप्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी भाजप कार्यालयाच्या बाहेर हाेती.  उमेदावारी दिल्याबद्दल बापट यांनी आनंद व्यक्त केला असून भाजप नेतृत्वाचे आभार मानले आहेत. 

बापट म्हणाले, पुणे शहराच्या उमेदवारीसाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल भाजपाच्या नेतृत्त्वाचे आभार. त्याचबराेबर मित्र पक्षांचे सुद्धा धन्यावाद. निवडणूकीत प्रत्येक भागामधून एकच उमेदवारी असते. पक्षामध्ये अनेक सक्षम उमेदवार आहेत, असतात आणि राहतील. त्यातून एकाचीच निवड करावी लागते. याचा अर्थ दुसरा कमी आहे, असे नाही. पुणे शहरात अनेकजण उमेदवारीसाठी उत्सुक हाेते. ते सर्व सक्षम उमेदवार हाेते. निवडूण येण्याच्या शक्यतेवर आणि गुणवत्तेच्या आधारे पक्षनेतृत्व काेणाला उमेदवारी द्यायची याचा विचार करत असते. पुणे शहराची लाेकसभा आम्ही प्रचंड मताधिक्याने जिंकणार आहाेत. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून जी विकासाची कामं सुरु केली, त्यातून आम्ही सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवला आहे. गेली 15 वर्षे केवळ घाेषणा हाेत हाेत्या. मेट्राेचा प्रश्न दुर्लक्षित हाेता, ताे मार्गी लावला. पुण्यातले प्रश्न कागदावर नाहीतर रस्त्यावर दिसू लागले आहेत. पाणी, स्वच्छतेचे, नदी सुधारण्याचे प्रश्न साेडविण्यात येत आहेत. अनेक याेजना राबविण्यात आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार असा आत्मविश्वास मला आहे. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणेBJPभाजपाanil shiroleअनिल शिरोळे