मरतड देवस्थानचा ‘गोंधळ’

By Admin | Updated: November 28, 2014 23:03 IST2014-11-28T23:03:08+5:302014-11-28T23:03:08+5:30

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा:या खंडोबा देवस्थानची देखभाल करणा:या मरतड देवसंस्थान विश्वस्त मंडळातील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

'Ghuddhal' of Martad Devasthan | मरतड देवस्थानचा ‘गोंधळ’

मरतड देवस्थानचा ‘गोंधळ’

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा:या खंडोबा देवस्थानची देखभाल करणा:या मरतड देवसंस्थान विश्वस्त मंडळातील वाद चव्हाटय़ावर आला आहे. एका महिला विश्वस्ताकडून दुस:या विश्वस्ताला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत त्या विश्वस्ताने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अन्य विश्वस्तांच्या त्रसाला कंटाळून आपण राजीनाम देत असल्याचे, त्या महिला विश्वस्ताने धर्मादाय आयुक्तांना कळविले आहे. 
दोन वर्षापूर्वीच जेजुरीच्या देवसंस्थानच्या 7 विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, या वेळी प्रथमच एका महिला विश्वस्ताचीही नेमणूक करून कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विश्वस्त मंडळात समन्वय राहिला नाही. 
महिला विश्वस्त नंदा प्रदीप राऊत यांनी आपणास जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद जेजुरी पोलीस ठाणो व धर्मादाय आयुक्तांकडे विश्वस्त संदीप घोणो यांनी लेखी स्वरूपात केली आहे. राऊत यांना साडेसोळा लाख रुपये किमतीच्या देवस्थानच्या महाप्रसाद देणगीच्या पावती पुस्तकाबाबत विचारणा केली असता, धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
देवस्थानच्या कस्टडीतील पावती पुस्तके परस्पर नेता येतात का? अशी तक्रार देवसंस्थान मंडळ आणी धर्मादाय आयुक्तांकडे केल्याने चिडून राऊत यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तशी फिर्याद जेजुरी पोलीस ठाणो आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुख्यमंत्री, तसेच गृह मंत्रलयाकडे करण्यात आली आहे.  
या संदर्भात विश्वस्त नंदा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर पावती पुस्तके मी विश्वासतांना विचारून नेली होती. मी मुंबईत राहत असून, देवस्थानाला मदत करणा:या भाविकांकडून देणग्या स्वीकारण्यासाठीच मी ही पुस्तके स्व:ताकडे ठेवली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात देवस्थानच्या विश्वस्त मंडळात समन्वय नसून देवसंस्थान मंडळ योग्य न्याय देऊ शकत नाही. हे देवस्थान शासनाने ताब्यात घेऊन तेथे प्रशासक नेमण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.  चौकशी सुरू असून संबंधितांचे जाब-जबाब घेण्यात येत असल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. रामदास शेळके यांनी सांगितले.  (वार्ताहर)
 
नंदा राऊत यांचा राजीनामा
श्री मरतड देव संस्थान  जेजुरीच्या विश्वस्तपदाचा नंदा राऊत यांनी आज मुंबई  धर्मादाय आयुक्तांकडे  देव संस्थानच्या अन्य विश्वस्तांच्या त्रसाला कंटाळून राजीनामा  देत असल्याचे पत्रद्वारे कळविले आहे. 

 

Web Title: 'Ghuddhal' of Martad Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.