घोटवडे ग्रामस्थांनी केला गावकारभाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:15 IST2021-02-21T04:15:34+5:302021-02-21T04:15:34+5:30
सदर प्रसंगी कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी निमंत्रित न करता फक्त घोटवडे ग्रामस्थ व ग्रामपंचायत विकासकामाशी संबंधीत ...

घोटवडे ग्रामस्थांनी केला गावकारभाऱ्यांचा सत्कार
सदर प्रसंगी कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी निमंत्रित न करता फक्त घोटवडे ग्रामस्थ व ग्रामपंचायत विकासकामाशी संबंधीत अधिकारी निमंत्रित केले. त्यामध्ये गटविकास अधिकारी, वीजवितरण कंपनी अधिकारी, कृषी खाते व लुपिन फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे, राजाराम शेळके, संतोष गोडाबे, भाग्यश्री देवकर, सारिका खाणेकर, वैशाली कुंभार, मंगल गोडाबे, निकिता घोगरे, संभाजी गोडाबे, सोनाली मातेरे यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन शंकर मातेरे यांनी केले तर आभार भाग्यश्री देवकर यांनी मानले. यावेळी कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळण्यात आल्याची माहिती घोटवडे ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी दिली.