शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात  ‘गझल’ दुर्लक्षितच : भीमराव पांचाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 22:12 IST

‘ गझल’ या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही.

ठळक मुद्देपुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमात पांचाळे यांचा संवाद

पुणे : ‘ गझल’ या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही  ‘गझल’ या साहित्य प्रकाराचा प्रसार होऊ शकेल, यासाठी अनेकदा विनंती आणि अर्ज करून झाले. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलन वगळता इतर साहित्य संमेलनात ‘गझल’ हा साहित्य प्रकार सातत्याने दुर्लक्षितच राहिला असल्याची खंत ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांनी शनिवारी व्यक्त केली.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमात पांचाळे यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या वेळी त्यांनी काही गझलांचे गायन केले. संघाचे खजिनदार सुनील जगताप, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.गझलमधील प्रत्येक शेर ही वेगळा आशय अभिव्यक्त करणारी स्वतंत्र कविता असते. त्यामुळे गझल ही कवितांची कविता आहे. काही मित्र आणि मित्रांनी धरून आणलेले चार रसिक यांच्यासमोर १९७२ मध्ये गजलगायनाची मैफल केली. तो काळ गजलसाठी प्रतिकूल होता. मात्र गझलबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. गझलेने कवितेवर आक्रमण केले असेही सांगितले गेले. पण, कुठलाही कलाप्रकार हा एकमेकांसाठी पोषकच असतो. ’भावगीत’ ही शब्दप्रधान गायकी असेल, तर गझल ही आशयप्रधान गायकी आहे. गझल गाताना आशयाला प्रधान मानले पाहिजे. रसिकांना आपली गायकी दाखविण्यासाठी नाही, तर दोन ओळीतील शेरांचा आशय पोहोचवण्यासाठी गायन करायचे, हा दंडक पाळूनच मी गझल गायन करतो, असेही त्यांनी सांगितले.त्या-त्या टप्प्यात अनेक सामाजिक विषय ऐरणीवर आले. त्यामुळे समाजाच्या संवेदना टिपणारी गझल ही सामाजिक झाली. प्रेम आणि विरह या भावनांपलीकडे जात गझलमध्ये माणसाच्या जीवन-मरणाचे प्रश्न, समाजातील विषमता असे विषय आले. गझल हा अंतर्मुख करणारा प्रकार आहे. त्यावर कोणी नाचू शकत नाही. आता कोणीही गझललेखन करू शकतो. हे गझल या काव्य माध्यमाचे बलस्थान झाले आहे,मात्र, प्रेम हाच गझलेचा स्थायीभाव आहे, तो गझलमध्ये यायलाच हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.----------------------

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतliteratureसाहित्य