शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 14:49 IST

पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून पुणेकरांचे हाल होत आहेत.

पुणे: रद्द करा रद्द करा ,हेल्मेट सक्ती रद्द करा, पुणेकरांच्या मानगुटीवर बसणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, पुणेकरांच्या एकजुटीचा विजय असो , तुम्ही लावा कितीही शक्ती आम्हाला नको हेल्मेट सक्ती,  पालकमंत्री जागे व्हा अशा घोषणा देत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती पुणे यांनी मंडई टिळक पुतळा येथे घंटानाद आंदोलन केले. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरातवाला, नगरसेवक संदीप खर्डेकर, रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक शाम देशपांडे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब दाभेकर, शिवसेना कसबा विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे, काँग्रेस नेत्या डॉ सुनिता पवार, मंदार जोशी, अखिल ब्राम्हण महासंघ अध्यक्ष आनंद दवे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित होते. पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून पुणेकरांचे हाल होत आहेत. एखाद्या माणसाचे उत्पन्न दिवसाला तीनशे रुपये असेल तर तो पाचशे रुपये दंड भरत आहे. पुण्यातील रस्ते लहान असून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या समितीने आंदोलनात हेल्मेट सक्ती रद्द करावी यासाठी आंदोलन केले. हेल्मेटसक्तीने पुणेकरांचे हाल शासन मात्र मालामाल, हेल्मेट सक्ती हटाव पुणेकर बचाव, हेल्मेट उत्पादकांचे हिट साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो अशा पताका दाखवून हेल्मेटसक्ती विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.भाजपा आमदार कुठ गेले. ते आता काही बोलत नाहीत. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येतात. पोलिसांनी ही सक्ती करू नये. पुणेकरांचा मानगुटीवर बसवून लूट होत आहे. अशा विचार पुणेकर नागरिकांनी यावेळी मांडले. कृती समितीचे पदाधिकारी म्हणाले, हजारो तरुण आणि पुणेकरांनी सांगितलं की आम्हाला हेल्मेटसक्ती नको. पुणेकरांच्या जीवाची काळजी असेल तर गुन्हेगारी, तोडफोड होत आहे त्यावर कारवाई करा. अनेक संघटना कृती समितीच्या पाठिंबा दिला आहे.

............

हेल्मेटसक्ती कृती विरोधी समिती आणि आमदार मेधा कुलकर्णी दोघांमध्ये खडाजंगी.कृती समितीचे सदस्य घंटा आंदोलनात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत होते. मेधा कुलकर्णी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्याठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी आमदार कुलकर्णी म्हणाल्या, गिरीश बापट यांच्याबद्दल घोषणाबाजी करू नका. हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामध्ये पालकमंत्र्यांची काही चूक नाही. या वक्तव्यावरून कृती समिती आणि मेधा कुलकर्णी यांच्यात  खडाजंगी झाली. 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिस