पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:39+5:302021-03-04T04:18:39+5:30

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छता आणि आरोग्यास धोका असलेल्या व्यवसायात गुंतलेल्या मुलांच्या पूर्व-मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी, अशी विनंती ...

Get pre-matric scholarship amount | पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी

पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छता आणि आरोग्यास धोका असलेल्या व्यवसायात गुंतलेल्या मुलांच्या पूर्व-मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम मिळावी, अशी विनंती कचरावेचकांच्या तब्बल दीड हजार मुलांनी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. या मुलांनी वस्ती-झोपडपट्टी पातळीवरून हे अभियान सुरू केले आहे.

आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिनाच्या निमित्ताने कचरावेचकांच्या मुलांनी केली शिष्यवृत्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत शाळेत शिकणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते. २०१८ पासून केंद्र सरकारकडून ११० प्रती माह शिष्यवृत्ती देणार होती. या शिष्यवृत्तीमध्ये २२५ प्रती माह अशी वाढ केली आहे. कागद काच पत्रा कष्टकरी पंचयातीच्या प्रतिनिधींनी मुंढे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केल्यामुळे या विषयावर कार्यवाही झाली नाही.

कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमधून शिथिलता दिली. शासकीय कार्यालये, राज्य सरकारचे कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. अधिवेशनही घेतले जात आंबे. त्यामुळे कचरावेचकांच्या मुलांचा विचार करून शिष्यवृत्ती देण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मुलांनी केली आहे. परंतु, राज्य सरकारकडून ती सुरू करण्यात आलेली नसल्याने ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती माहिती कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या पूर्णिमा चिकरमाने यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Get pre-matric scholarship amount