जाणून घ्या ‘व्हाईट कोट’मागील डॉक्टरांना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:41+5:302021-08-28T04:14:41+5:30
आपण शरीराने किंवा मनाने आजारी पडलो किंवा कामाचा, जबाबदारीचा ताण आला की डॉक्टरकडे जातो. डॉक्टर रुग्णसेवेसाठी कायमच तत्पर असतात. ...

जाणून घ्या ‘व्हाईट कोट’मागील डॉक्टरांना!
आपण शरीराने किंवा मनाने आजारी पडलो किंवा कामाचा, जबाबदारीचा ताण आला की डॉक्टरकडे जातो. डॉक्टर रुग्णसेवेसाठी कायमच तत्पर असतात. पांढ-या कोटमधील डॉक्टर समोर पाहिले की रुग्णाचा अर्धा आजार पळून जातो. डॉक्टरी व्यवसायाला वेळ-काळाचे बंधन नसते, असे म्हटले जाते आणि ते तंतोतंत खरेही आहे. सर्वसाधारण लोकांपेक्षा डॉक्टरांचे आयुष्य जास्त धावपळीचे, दगदगीचे आणि तणावयुक्त असते. आपल्या अनुभवाच्या जोरावर डॉक्टर या तणावातून अचूक मार्ग शोधतात आणि धावपळीवर मातही करतात. डॉक्टरांच्या आयुष्यातील समतोलाचे रहस्य ‘बिहार्इंड अ व्हाईट कोट’ या झूम वेबिनारच्या माध्यमातून जाणून घेता येईल. डॉ. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टरांविषयीच्या अनेक कुतुहलांचे निरसन होऊ शकेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.