शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील होर्डिंग दुर्घटना ग्रस्तांना रेल्वेकडून मिळणार नुकसान भरपाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:56 IST

होर्डिंग दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींचे नातेवाईक तसेच वाहनांचे झालेले नुकसान याबाबत संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ठळक मुद्देखासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट

पुणे : होर्डिंग दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींचे नातेवाईक तसेच वाहनांचे झालेले नुकसान याबाबत संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित सर्वांना प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.  खासदार अनिल शिरोळे  यांच्या नेतृत्वाखाली  रिक्षा पंचायत,आम आदमी पार्टी यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट घेतली. यावेळी पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, आपचे मुकुंद किर्दक, श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश यांनी सहभाग घेतला. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील व अन्य अधिकारीही उपस्थित होते. रेल्वेच्या चुकीमुळे होर्डिंग दुर्घटना झाली असून त्यात चार जणांचा बळी गेला. तसेच काही जण जखणी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे अपघातग्रस्तांना प्राथमिक मदत देत आहे. मात्र मोटार अपघात नुकसान भरपाई कायद्यानुसार मृताच्या वारसांना व अपघाताने शारीरिक नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी, रेल्वे दावा प्राधिकरणामध्येही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी संघटनांनी केली. कोणत्या प्रकारे नुकसान भरपाई दावे दाखल करायचे हे निश्चित झाल्यावर त्यानुसार प्रत्येक अपघातग्रस्ताचे दावे मागणी अर्ज भरून देण्यापासून सर्व ते सहकार्य रेल्वे करेल असे, देऊस्कर व पाटील म्हणाले. त्यानंतर पुणे पोलीस परिमंडळ २ चे उपायुक्त बच्चन सिंग यांचीही भेट घेण्यात आली. या अपघातात नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये मोटार अपघात विषयी कलमांचा अंतर्भाव करावा अशी मागणी करण्यात आली. -------------------

 

टॅग्स :Puneपुणेanil shiroleअनिल शिरोळेrailwayरेल्वे