शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

खडक पोलिसांकडून ‘सज्जन’ चोरटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 15:11 IST

खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्‍या करणार्‍या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्‍याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देहर्षल राजाराम पिसाळ (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे.पिसाळ हा सराईत वाहन चोरटा असून तो नातुबाग पेट्रोलपंपाजवळील दांडियाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक अनिकेत बाबर यांना मिळाली होती.आरोपी डिकीमधील पर्स चोरल्यानंतर त्यातील फक्त रोकड काढून घेत होता. उर्वरीत कागदपत्रे अथवा माल फेकून देत होता. 

पुणे : खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्‍या करणार्‍या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्‍याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याला  ‘सज्जन’ चोर असे म्हणून ओळखले जाते.हर्षल राजाराम पिसाळ (वय ४३, रा. शिवतेज नगर, बकुळ हॉलजवळ) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसाळ हा सराईत वाहन चोरटा असून तो नातुबाग पेट्रोलपंपाजवळील दांडियाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक अनिकेत बाबर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला गजाआड करण्यात आले. तपासादरम्यान, त्याने दुचाकींच्या डिकी उचकटून त्यातील रोकड, मोबाईल आणि वाहने चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी, मोबाईल व २१ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्यावर २४ पेक्षा अधिक गुन्हे केल्याची माहिती दिली. त्याच्याविरुद्ध खडक, विश्रामबाग, सहकारनगर, बिबवेवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. तर शुभम शेंडकर (वय २३, रा. मंगळवार पेठ) हे शुक्रवार पेठेतील रेणुकामंदिरासमोर मोटारीच्या काचा उघड्या ठेवून झोपलेले असताना आरोपीने त्यांचा मोबाईल लंपास केला होता. त्याच्याविरुद्ध डेक्कनला दहा, स्वारगेटला पाच, सहकारनगरमध्ये तीन, येरवड्यात दोन, फरासखाना, विश्रामबाग, कोथरुडमध्ये प्रत्येकी एक असे एकूण २३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी डिकीमधील पर्स चोरल्यानंतर त्यातील फक्त रोकड काढून घेत होता. उर्वरीत कागदपत्रे अथवा माल फेकून देत होता. त्याला न्यायालयाने ३ आॅक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी विजय कांबळे, गणेश माळी, इम्रान नदाफ, अनिकेत बाबर, आशिष चव्हाण, राकेश क्षीरसागर, गणेश सातपुते यांनी केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोरPuneपुणे