पुणे : राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) नव्याने तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या १३० वर पोहोचली आहे. त्यातील २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. गेल्या २४ तासांत जीबीएसबाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, नागरिकांनी घाबरू नये; पण खबरदारी घ्यावी. पाणी उकळून गार करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.१३० पैकी २५ रुग्ण पुणे महापालिका, ७४ रुग्ण समाविष्ट गावांतील, १३ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील, ग्रामीणमध्ये ९ आणि इतर जिल्ह्यातील ९ रुग्ण आहेत. जीबीएसमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान, आतापर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील ३७ हजार ८०३, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील ९ हजार ६९, तर ग्रामीणमधील ११ हजार ३७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.वयोमानानुसार रुग्णसंख्यावय - एकूण रुग्णसंख्या० ते ९ : २२१० ते १९ : १९२० ते २९ : ३०३० ते ३९ : १६४० ते ४९ : १३५० ते ५९ : १८६० ते ६९ : १२