शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Gautami Patil : "तर मी लगेच लग्न करेन..."; गौतमी पाटीलने लग्नाबाबतच्या प्रश्नाला दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 21:37 IST

Gautami Patil on Marriage: पत्रकारांशी संवाद साधताना गौतमीने सांगितली 'मन की बात'

Gautami Patil on Marriage |  बारामती: "माझ्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतोय. जाईल तिथे लोक माझ्या कलेला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. माता-माऊलीचं प्रेम मिळत आहे. तरुण गर्दी करतायेत. अशात तर लग्नाचा विचार नाही. पण एखादा अनुरुप मुलगा मिळाला की मी लगेच लग्न करेन. जसा कार्यक्रमात राडा करता, तसा लग्नातही राडा करा," अशी मिश्कील टिपण्णी प्रसिध्द नृत्यांगना कलाकार गौतमी पाटील हिने केली. माळेगाव (ता.बारामती) येथील येळेढाळे वस्तीत श्री लक्ष्मीआई यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा तिने हे उत्तर दिले.

या कार्यक्रमाचे  उद्घाटन जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे यांनी केले. यात्रा कमिटीने केलेले चोख नियोजनासह पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहकारी पोलिसांनी कार्यक्रमासाठी चोख  बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कोणताही राडा, गोंधळ न होता कार्यक्रम शांतपणे पार पडला. यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये विशेषत: महिलांची संख्या अधिक होती.

लग्नाचा विषय अन् गौतमी...

लावण्यांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तिला मागील एका मुलाखतीत आपण लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. आपण कधी लग्न करणार आहात? असा प्रश्न विचारला. त्यावर तिने पत्रकारांशी बोलताना हसतहसत हि मिश्कील टिपण्णी केली.

दरम्यान, यावेळी सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पाव्हणं जेवला का, बाई मी ऐवज हवाली केला, पाटलांचा बैलगाडा या गाण्यांसह थेट महिला वर्गासमोर जाऊन गौतमी पाटील यांनी केलेल्या नृत्याला ‘वन्स मोअर’ने उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलmarriageलग्नBaramatiबारामतीdanceनृत्य