शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये आला रानगवा, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 12:43 IST

Pune News : अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे - शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत गवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले आहे. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गवा सदृश्य रानटी प्राणी सोसायटीत आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे यांनी सांगितले. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना हे दृश्य दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले.

गवा चुकल्यामुळे बिथरला आहे. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज आहे. पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल छाले असून मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे.

. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत आहे. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम होऊन रक्त येत आहे.

रानगवा बिथरला असल्याने प्रथम त्याला शांत करण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. तो बहूदा डूक्कर खिंडीतून रात्री आला असावा, मात्र नागरिकांनी म्हैस महणून दुर्लक्ष केले असावे, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी दीपक पवार यांनी ʻलोकमतʼ ला दिली.

बिथरलेल्या रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने मदत कार्य रेंगाळले आहे. ज्यादा डोसची तजवीज करण्यात येत आहे. या परिसरात आता बघ्यांची गर्दी झाली आहे.दरम्यान, जंगलातून चुकल्यामुळे भिंतींना धडका देणारा रानगवा आता काहीसा शांत झाला असून एके ठिकाणी शांत उभा आहे.दरम्यान भूलीच्या डोसची तजवीज करण्यात येत आहे.

रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी आवश्यक तेवढ्या आषधाचाडोस वनविभागाला मिळाला असून आता थोड्याच मिनिटात तो डोस देण्यात येईल अशी वनविभागाने माहिती दिली आहे. 

अयो ! गवा पळाला...

एका झाडाखाली शांत उभा असलेला गवा आता तेथून बाहेर पडून नागरी वस्तीकडे पळाला आहे. महात्मा सोसायटीच्या गेटवरून नागरी वस्तीकडे पळण्यात यशस्वी झालेला रानगवा भुसारी कॉलनी, गादिया इस्टेट, भारतीनगरमार्गे मुख्य पौडरसत्यावर आला आणि तेथून जूना कचराडेपोजवळील जंगलाकडे पळाला. त्याच्यामागे रेस्क्यू टीमबरोबरच अतिउत्साही नागरिक आरडा ओरड करीत पळत असल्याने गवा आणखीनच बिथरला आहे. आत्ता तो दिसेनासा झाला असून राहूल टॉवर्स परिसरात शोध घेतला जात आहे.

 

नागरिकांच्या प्रचंड गोंधळातच वन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तीनवेळा डार्ट (भूलदेण्यासाठी फेकून मारायचे इंजेक्शन) मारलेआहेत. त्यापैकी एक प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.दरम्यान नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होत आहे. नागरिकांमुळे गवा बिथरल्याने पोलिस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. सुदैवाने ६-७ किलोमीटर पळूनही गव्याने कोणालाही जखमी केलेले नाहीगवा आत्ता परत भारतीनगर सोसायटी परिसरात एका बंगल्यात बसला आहे.

तब्बल 3 तासांअखेर रानगवा जाळ्यात

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात जाळ्यात अडकला आणि भुलीच्या इंजेक्शनमुळे बेशुध्द पडला. आता वन विभाग त्यास गाडीतून घेऊन जात आहे

 

टॅग्स :Puneपुणे