शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pune| चाकणमध्ये कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्यांना तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:27 IST

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक केली...

पिंपरी : व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरीचे प्रकार समोर येत असतानाच थेट कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नरसिंग दत्तू फड (वय ३१), अमोल गोविंद मुंडे (वय २८, दोघेही रा. बीड), राजू बबन चव्हाण (वय ५२, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील रासे येथे कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. कॅप्सूल टँकरमधून एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये धोकादायकपणे भरून गॅसची चोरी करताना आरोपी आढळून आले. 

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई-वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणे चौकात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी (दि. १४) कारवाई केली. धनराज मल्लप्पा वाघे (वय २८), शुभम रघुनाथ गवळी (वय २७, दोघेही रा. रहाटणी), काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय ४९, रा. चिंचवड), अतिश अंबादास कसबे (वय २८), सुरेश राजकुमार म्हेत्रे (वय २५, दोधेही रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख २२ हजार ५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

सिलिंडरचे वजन करावे-आपल्या घरी येत असलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे वजन करून नागरिकांनी सावधानता बाळगावी. गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीकडून सिलिंडर घेताना वजन करून घ्यावे, सिलिंडरचे वजन कमी असल्यास किंवा संबंधित प्रतिनिधीने वजन करून देण्यास नकार दिल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीChakanचाकण