शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दोन नेत्यांच्या राजकीय साठमारीत रखडली उद्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 13:04 IST

तळजाई टेकडीची रडकथा :

ठळक मुद्देकार्यारंभ आदेश देऊनही काम नाहीस्थानिक नागरिकांचा विरोधप्रकरण न्यायप्रविष्ट

पुणे : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या राजकीय साठमारीत तळजाई टेकडीवरील दोन नियोजित उद्याने रखडली आहेत. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही ठेकेदार कंपनीला जमीन मोजून मिळत नसल्याने कामाला सुरुवात व्हायला तयार नाही. दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रभावामुळे प्रशासनही यात हस्तक्षेप करायला तयार नाही.तळजाई टेकडीचा विकास आराखडा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. त्यासाठी निधी मंजूर आहे. त्यातूनच टेकडीवर सदू शिंदे क्रिकेट मैदान तयार झाले. त्याचबरोबर विकास आराखड्यात टेकडीवर उद्याने, संकुले, तलाव, पक्षिनिरीक्षण केंद्रे, वनविहार यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातच नक्षत्र उद्यान व बांबू उद्यान असे दोन मोठे प्रकल्प आहेत. प्रत्येकी ५ एकर जागेवर ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी ठेकेदार कंपनी निश्चित करून त्यांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.काँग्रेसचे आबा बागुल व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जगताप अशा दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये या टेकडीच्या विकासकामांवरून बरेच वाद आहेत. दोघांकडूनही टेकडीवर बरीच विकासकामे त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात झाली आहेत. मात्र आता त्यांच्यात कामाचे श्रेय कोणाला यावरून वाद होत असून, त्याचा अनिष्ट परिणाम प्रशासनावर होत आहे. दोन्ही नियोजित उद्यानाची रखडलेली कामे हा त्याचाच परिणाम आहे. प्रशासनाने यात योग्य भूमिका स्वीकारण्याची गरज असूनही तसे होताना दिसत नाही.उद्यान विभागाला उद्यान कुठे करायचे ती जागा मोजून हवी आहे. जागा मोजणी करणाºया मालमत्ता विभागाचे म्हणणे हे, की जागा अद्याप आमच्याकडे हस्तांतरित झालेली नाही. पालिकेच्या विधी विभागाला जागेचे सध्याचे स्टेटस काय आहे तेच सांगता येत नाही. उद्याने प्रस्तावितआहेत, तर ती व्हायला हवीत असे बागुल यांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांचा टेकडीवर कसलेही बांधकाम करायला मनाई आहे असा जगताप यांचा दावा आहे. या गदारोळात ठेकेदार कंपनीला काम मिळूनही काम करणे अशक्य झाले आहे. पालिकेच्या या सर्व विभागांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यापैकी कोणीही बागुल व जगताप यांच्याबरोबर वाईटपणा नको म्हणून स्पष्टपणे बोलायला तयार नाही. आयुक्त सौरभ राव या कामांबाबत आग्रही आहेत. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बोलावून ताब्यात आहेत त्या जागांवर तरी किमान कामांना सुरुवात करण्याचे आदेशही दिले होते, मात्र त्यानंतर ते प्रशिक्षणासाठी म्हणून महिनाभर मसूरीला गेले. त्यानंतर प्रशासन काही करायला तयार नाही. टेकडीवरील काही जागांचे खासगी मालक पालिकेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयात पालिकेच्या विरोधात निकाल लागला, त्यामुळे पालिकेने आता सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. गेले अनेक महिने हा दावा सुनावणीला आलेला नाही. त्याचेच कारण पुढे करत प्रशासन उद्यानांच्या कामाला सुरुवात करण्याची टाळाटाळ करत आहे. यात उद्यानात लावण्यासाठीम्हणून आणलेली विविध रोपेही पडून आहेत...........स्थानिक नागरिकांचा विरोधटेकडीवरील विकासकामांच्या संदर्भात स्थानिक नगरसेवकांची बैठक आयुक्तांसमवेत झाली. त्यात टेकडीचे स्वरूप बदलेल अशी कोणतीही कामे करण्यास स्थानिक नगरसेवक, नागरिक यांनी विरोध केला आहे. या परिसराचा श्वास असलेल्या या टेकडीवरील पर्यावरण, वनसंपदा धोक्यात येईल असे तिथे काहीही होऊ नये, आणि या आग्रहात राजकारणही नाही.- सुभाष जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वीकृत सदस्य.....प्रकरण न्यायप्रविष्टटेकडीवर २०० प्लॉट होते. नियमाप्रमाणे पालिकेने ते ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडे पैसे दिले होते. त्यांनी काही जागा ताब्यात घेतल्या, पण पैसे दिले नाहीत. काहींनी पैसे घेतले पण जागा ताब्यात दिल्या नाहीत, तर काहींनी पैसे घेऊन, जागा देऊनही पालिकेच्या विरोधात दावा दाखल केला. ती सगळीच प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात आहेत. जागेची मोजणी करण्याआधी न्यायालयीन प्रकरणे निकाली निघणे गरजेचे आहे.- राजेंद्र थोरात,  वरिष्ठ अभियंता, भूसंपादन विभाग, महापालिका

टॅग्स :PuneपुणेTaljai Tekdiतळजाई टेकडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस