शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका तयार करणार ‘राडारोडा’ संकलन केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 18:10 IST

शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने ‘राडारोडा संकलन केंद्र’ उभारण्यात येणार आहे.            

ठळक मुद्देवाहतुकीसाठी प्रती मे.टन व प्रती किलोमीटरसाठी १९ रुपये दर निश्चित राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राडारोडा उचलण्यासाठी १८००२३३९५९५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

पुणे : शहरामध्ये दररोज निर्माण होणा-या प्रचंड राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. यामध्ये शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने ‘राडारोडा संकलन केंद्र’ उभारण्यात येणार आहे.            शहरामध्ये सुरु असलेली खाजगी बांधकामे, रस्त्यांची कामे, मेट्रो प्रकल्पाचे कामे, विविध प्रकल्पांची कामे, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यामुळे दररोज शेकडो ट्रक राडारोडा निर्माण होतो. सध्या हा राडारोडा टाकणे व त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही स्वतंत्र यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामुळे खासगी लोकासह अनेक सार्वजनिक बांधकामांचा राडारोडा देखील शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला, नदी पात्र, ओढे-नाल्यांमध्ये टाकला जातो. तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक नदी पात्र व अन्य सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करण्यासाठी या राडारोड्याचा वापर केला जातो. या सर्व प्रकरांवर निर्बंध घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता शहरामध्ये निर्माण होणा-या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपया-योजना करण्याचा निर्णय घेतला आहे.     याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले की,  घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरामध्ये निर्माण होणा-या राड्यारोड्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे.  यात राडारोडा वाहतुक करणे, राडारोड्यावर प्रक्रिया करणे, राडारोडा ठेवण्यासाठी जागा निश्चित करणे, संकलन करण्यात आलेला राडारोडा आवश्यकतेनुसार भूभरावासाठी आणि उपनगरांमध्ये असलेल्या खाणीचा भाग समतल करण्यासाठी वापरणे आदींचा समावेश आहे. यामध्ये महापालिका हद्दीतून राडारोडा संकलीत करून त्याच्या वाहतुकीसाठी प्रती मे.टन व प्रती किलोमीटरसाठी १९ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये जीपीएस यंत्रणेद्वारे अंतराचे राड्यारोड्याचे मोजमाप करण्यात येईल. ---------------राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी येथे संपर्क करामहापालिकेच्या वतीने शहरामध्ये खाजगी व्यक्ती, संस्थांकडून निर्माण होणा-या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांनी राडारोडा उचलण्यासाठी १८००२३३९५९५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. निर्माण होणारा राडारोडा नदीपात्र, नाले, रस्ते यांच्या कडेला टाकला जाणार नाही, याची दक्षता आता महापालिकेकडून घेण्यात येणार असल्याचे संबंधित अधिका-याने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका