शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुठा कालव्यातून निघतोय कचऱ्याचा गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:13 IST

दुरुस्तीची काम युद्धपातळीवर : सव्वापाच हजार घनफुटांचा कचरा

ठळक मुद्देकालव्यातून थमार्कोल, प्लास्टिकपासून विविध प्रकारच्या कचऱ्याचाच गाळ लक्षणीयकालव्याच्या आतील बाजुचा वाहून गेलेल्या भागाचीही डागडुजी जानेवारी महिन्यामधे सिंचनासाठी रब्बी आवर्तन सोडण्याचे नियोजन

पुणे : खडकवासला धरणातून जाणाºया मुठा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणाचे, दुरुस्तीचे आणि गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, गाळामधे सुमारे ५ हजार २५० क्युबिक मीटर ( ३० टक्के) कचराच असल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून थमार्कोल, प्लास्टिकपासून विविध प्रकारच्या कचऱ्याचाच गाळ लक्षणीय असल्याचे पाटबंधारे विभागीतल अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक वषापार्सून नवीन उजवा मुठा कालव्याची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नव्हती. गेल्यावर्षी पर्वती पायथ्याला कालवा फुटल्याने दांडेकर पूल वसाहतीतील अनेक घरे वाहून गेली होती. त्यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. यंदा धरणसाखळीत जोरदार पाऊस झाल्याने कालवा जवळपास दीड महिने वाहता होता. त्यामुळे खडकवासला धरणापासून शून्य ते तीस किलोमीटर या शहर हद्दीतील कालव्याच्या भरावांचे मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आत्तापर्यत जवळपास २० किलोमीटर पर्यंतच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. शहर परिसरातून वाहणाºया कालव्यामधे तब्बल १७ हजार ५०० घनमीटर गाळ होता. या गाळापैकी ५ हजार २५० घनमीटर (३० टक्के) कचराच आहे. त्यात थमार्कोलचे तुकडे, निर्माल्य, प्लास्टीक अशा विविध प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे. या शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे कालव्याच्या आतील आणि बाहेरील बाजुची झीज झाली होती. कालव्या लगत असलेल्या सेवा रस्त्यांची रुंदी कमी झाल्याचे आढळून आले होते. मुरुमटाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. तर, कालव्याच्या आतील बाजुचा वाहून गेलेल्या भागाचीही डागडुजी करण्यात आली. हडपसर आणि बी. टी. कवडे रस्ता येथे कालव्यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. वडगाव आणि धायरी येथील कालव्यालगतचा रस्ता आणि वाहून गेलाला भाग दुरुस्त करण्यात आला. सारसबाग, स्वारगेट आणि पूलगेट येथील दुरुस्तीची कामे देखील झाली आहेत. लवकरच राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील, असे पाटबंधारे विभागातील अधिकाºयांनी सांगितले. जानेवारी महिन्यामधे सिंचनासाठी रब्बी आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कालव्याच्या दुरुस्तीची आणि मजबुतीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.  

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी