शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कोल्हापूर , सांगली जिल्हयातील पूरग्रस्तांच्या घरी पुण्यातील गणपती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 17:55 IST

पुराचा फटका बसल्यानंतर महिन्याभराच्या आतच गणेश उत्सव आला आहे...

पुणे : अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा प्रचंड मोठा तडाखा बसला. या तडाख्यामुळे तेथील रहिवाशांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावेल लागले. आजतागायत त्या परिसरातील जनजीवन आता कुठे पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभमीवर राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मदतीचा हात पुढे आले. त्यात  पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आणि पुण्यातील विविध मंडळाकडून जीवनावश्यक वस्तू बरोबरच गणरायांच्या मूर्ती पूरग्रस्त कुटुंबाना भेट दिली आहे.पुराचा फटका बसल्यानंतर महिन्याभराच्या आतच गणेश उत्सव आला आहे. मात्र या महापुरात सांगलीतील गणेशमूर्ती घडविणाऱ्या शेकडो बांधवांचे देखील नुकसान झाले. अनेक तयार झालेल्या गणपतीच्या मुर्ती भिजल्या आहेत. याशिवाय अनेकांचे संसार पाण्यात गेल्याने या घरामध्ये यंदा गणरायाची स्थापना करण्यासारखी परिस्थिती नाही. नेमकी हीच अडचण ओळखून पुण्यातील काही सामाजिक संस्थांनी सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावात आणि घरात जीवनावश्यक वस्तू बरोबरच गणरायाच्या मूर्त्या देखील भेट दिल्या आहेत.

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या सहकार्यातून आणि जयहिंद स्पोर्टस असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा,  मुक्ताई सार्वजनिक ग्रंथालय, जागृती महिला मंडळ, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान, जयहिंद तरुण मंडळ या पुण्यातील संघटनांनी एकत्र येत सांगलीतील अनेक गावात गंणरायाच्या मुर्त्या या पूरग्रस्त सामान्य कुटुंबात दिल्या आहेत. यामुळे साध्या पद्धतीने का होईना या घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेश महोत्सवSangliसांगलीkolhapurकोल्हापूर