शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

बाप्पांच्या कृपेने काश्मीरमध्ये शांतता नांदेल; यंदा ३ ठिकाणी साजरा होणार गणेशोत्सव, पुनीत बालन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 12:46 IST

भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर खोऱ्यात मात्र गेल्या ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला

पुणे : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून या मंडळांना येत्या शनिवारी (दि. ३१) पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती सुपूर्द करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील सात गणेश मंडळांमध्ये पुणे येथील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा हे मानाचे पाच गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या सात मंडळांचा समावेश आहे.   ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. पुण्यातून मुहर्तवेढ रोवला गेलेला सार्वजनिक गणेशोत्सव साता समुद्रपार पोहचला आहे. जगभरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र, भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर खोऱ्यात मात्र गेल्या ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील मानाच्या सात गणपती मंडळांनी एकत्र येत त्यासाठी पाऊल टाकले आणि गतवर्षी कश्मीरमधील लाल चौकात गणपतीयार मंदिरात दीड दिवसांचा गणपती उत्सव जल्लोषात साजरा झाला. आता यावर्षीही कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मूर्ती बसविण्यात आली होती. आता यावर्षी अनुक्रमे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम व मानाचा चौथा गणपती तुळशीबाग यांच्या मूर्ती त्यासाठी सुपूर्त केल्या जाणार आहेत. येत्या शनिवारी काश्मीरमधील तिनही मंडळांच्या कार्यकर्त्यांना या मूर्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली.

‘‘काश्मीरमध्ये ३४ वर्षानंतर गतवर्षीपासून आम्ही पुन्हा गणेशोत्सव सुरू केला. यावर्षी पुण्यातील सात गणेश मंडळांच्या सहकार्याने कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्हाला होता आलं याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने काश्मीर खोऱ्यात शांतता नांदेल आणि तेथे भरभराट होईल, अशी खात्री आहे.’’ - पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवJammu Kashmirजम्मू-काश्मीरSocialसामाजिक