शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

गुंड शरद मोहोळने जेलमध्येच संपविले दहशतवादी कातील सिद्दीकीला, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:57 IST

शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याचा जुना इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला...

- किरण शिंदे

पुणे : मागील काही दिवसांपासून थांबलेल्या पुण्यातील टोळी  युद्धाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली. याला कारण ठरले ते गँगस्टर शरद मोहोळचा खून. कोथरूडच्या सुतारदरा परिसरात राहत्या घराजवळच शरद मोहोळचा खून करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून शरद मोहोळ सोबतच वावरणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याचा जुना इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला. तो गुन्हेगारी क्षेत्रात कसा आला, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे यावर चर्चा होऊ लागली. यासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा होऊ लागली. शरद मोहोळने येरवडा कारागृहात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्याची केलेली हत्या. या घटनेनंतर शरद मोहोळ संपूर्ण देशभरात चर्चेत आला होता. 

शरद मोहोळची गुन्हेगार क्षेत्रात एंट्री-

संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात आला. पुढे जाऊन तो मोहोळ टोळीचा म्होरक्या बनला. त्यानंतर मोहोळ टोळीने शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. यातून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, मारहाण करणे, शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे शरद मोहोळवर दाखल झाले. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली, मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये करण्यात आली. ते वर्ष होतं २०११. त्यानंतर २०१२ मध्ये येरवडा कारागृहात पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी कातिल सिद्दिकी याची एन्ट्री झाली.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामुळे देश हादरला...

२०१० च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यात बॉम्बस्फोट झाला होता. परदेशी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीजवळ हा स्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. पुढे तपास यंत्रणांनी या बॉम्बस्फोटाप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या काही दहशतवाद्यांना अटक केली होती. यातीलच एक दहशतवादी होता मोहम्मद कातील सिद्दिकी.

सतर्क नागरिकांमुळे अनेकांचे प्राण वाचले

ज्या दिवशी जर्मन बेकरीजवळ बॉम्बस्फोट झाला त्याच दिवशी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरही बॉम्बस्फोट करण्याचा इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा प्लॅन होता. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या यासीन भटकळने आपल्याजवळ असलेली बॅग जर्मन बेकरीत ठेवली. तर बॉम्ब असलेली दुसरी बॅग दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात ठेवण्याची जबाबदारी होती कातील सिद्दिकीवर. त्यानुसार कातील सिद्दिकी मंदिर परिसरात आलाही होता. बॅग ठेवण्याची त्याने तयारीही केली होती. मात्र काही सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने त्याला त्यात यश आले नाही. पुढे पोलिसांचा बंदोबस्त पाहून त्याने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. 

कातील सिद्दिकीचा खून

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान कातील सिद्दिकी याचही नाव समोर आलं. त्याला अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये झाली. एके दिवशी बातमी आली कातील सिद्दिकीच्या खुनाची. तो दिवस होता ८ जून २०१२ चा. दहशतवादी कातील सिद्दिकीचा तुरुंगात खून झाल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. तुरुंगातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये कातील सिद्दिकी होता आणि तरीही त्याचा पायजाम्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता. हा खून केला होता शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव याने.

पायजम्याच्या नाड्याने गळा आवळला-

त्यानंतर चर्चा सुरू झाली शरद मोहोळने कातील सिद्दिकीला मारल्याची. तेव्हा एकमेकांकडे खुन्नसने पाहिल्यामुळे हा खून झाला असं म्हटलं गेलं. तर दुसरीकडे अंडरवर्ल्ड माफियांनी हा खून घडवून आणला अशाही चर्चा होत्या. मात्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपत्रात दुसरीच माहिती नमूद आहे. अंडा सेलमध्ये असलेला कातील सिद्दिकी बाहेर पडल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोट करणार असल्याच्या धमक्या द्यायचा. यातूनच सिद्दिकी, मोहोळ आणि भालेराव यांच्यात भांडण झाले आणि या भांडणाच्या रागातूनच पायजम्याच्या नाड्याने गळा आवळून कातील सिद्दिकीचा खून करण्यात आला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही कातील सिद्दिकीचा खून झालाच कसा अशाही चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.

माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार, जेलच्या तेव्हाच्या नियमानुसार अंडा सेलमधील कैद्यांना सकाळी दोन तासांसाठी बाहेर सोडले जायचं. यावेळी इतर कैद्यांना मात्र त्यांच्या त्यांच्या बराकीत डांबून ठेवलं जायचं. ८ जूनच्या दिवशीही अंडा सेलमधील कैद्यांना बाहेर सोडण्यात आलं होतं. कातील सिद्दिकीने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर बॉम्बस्फोट करण्याची दिलेली धमकी आणि त्यानंतर झालेल्या भांडणाचा राग शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांच्या मनात आधीपासूनच होता. यातूनच या दोघांनी कातीलला संपवण्याचा कट रचला. त्यादिवशी दोघेही सिद्धीकीला ठेवण्यात आलेल्या अंडा सेलमध्ये घुसले, त्याला मारहाण केली आणि पायजमाच्या नाडीने गळा आवळून त्याचा खून केला.

निर्दोष सुटका

पुरावा नष्ट करण्यासाठी या दोघांनी नाडी जाळून टाकली. त्यानंतर काही वेळाने कातील सिद्दिकीचा खून झाल्याची माहिती तुरुंगातील पोलिसांना कळाली. या खून प्रकरणात पुढे काहीच झाले नाही. खुनाचे आरोप सिद्ध न झाल्यामुळे शरद मोहोळ आणि अलोक भालेराव या दोघांचीही निर्दोष सुटका झाली. मात्र या एका घटनेवरून शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी नेता होता अशी भलामण आता केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीyerwada jailयेरवडा जेलterroristदहशतवादी