बाणेर येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळके जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:14 IST2021-01-19T04:14:54+5:302021-01-19T04:14:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर रोडवरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सशस्त्र टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांच्या ...

Gangs preparing to rob petrol pump in Baner arrested | बाणेर येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळके जेरबंद

बाणेर येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळके जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बाणेर रोडवरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सशस्त्र टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांच्या तपास पथकाने पाठलाग करून जेरबंद केले. यावेळी त्याच्या ताब्यातून पिस्तूल, कोयता, मिरचीपुड असा १ लाख ४६ हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी फिर्याद दिली आहे. ललील ससाने (वय २३, रा. अप्पर), जयेश लोखंडे (वय २०, रा. जुना बाजार), निखील कुसाळकर (वय २२), रोहित धोत्रे (वय २१, दोघे रा. वडारवाडी), सुबोध सरोदे (वय २०, रा. पांडवनगर), सुरज वड्डा (रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, यातील आरोपी जयेश लोखंडे व निखील कुसाळकर या दोघांना तडीपार केले होते. असे असताना ते तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आढळून आले.

Web Title: Gangs preparing to rob petrol pump in Baner arrested