शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

ढोलताशांचा झाला गजर : आनंदोत्सवाला आला बहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 21:14 IST

पुण्यनगरीत ढाेलताशांच्या गजरात गणराय झाले विराजमान

पुणे :  बाप्पा येणार म्हटल्यावर प्रत्येकाच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. यात वयाचे कुठलेही बंधन नव्हते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाने लाडक्या गणरायाचे तितक्याच भक्तिभावाने केले. कपाळी गणपती बाप्पा मोरया नावाच्या पट्या बांधून, डोक्याला भगव्या रंगाचे फेटे बांधुन वेगवेगळ्या प्रकारची सुंदर वेशभुषा करुन तरुणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी घरगुती गणरायांची लवकर प्राणप्रतिष्ठा करुन पुणेकर मानाच्या पाच गणपती मंडळाच्या मिरवणूका पाहण्याकरिता बाहेर पडले. रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी मोठ्या दाटीवाटीत उभे राहून श्रींच्या मिरवणूकीचा आनंद घेतला. 

      ढोल ताशांच्या दणदणाटाने वातावरणात एक वेगळीच रंगत आणली. सहभागी झालेल्या प्रत्येक पथकाची वेगळी वेशभुषा होती. त्यामुळे आगळीच रंगसंगती यावेळी पाहवयास मिळाली. मोठ्या उत्साहात त्यांनी बाप्पासमोर आपली कला सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. पथकांमध्ये तरुणांचा सहभाग तर होताच याशिवाय लहान मुलेही जल्लोषात वादन करताना पाहून अनेकांना त्यांचे छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही. तरुणींने देखील फेटा बांधुन जोशात केलेले वादन अनेकांच्या कुतुहल आणि कौतुकाचा विषय होता. शनिवारवाड्याच्या बाहेर श्रींच्या मुर्त्यांच्या स्टॉलबाहेर देखील ढोल पथकांच्या काही तरुणांनी गर्दी केली होती. वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच नागरिकांना पर्यायी मार्ग सुचविण्यास मार्गदर्शन करत होते. यात विशेष करुन गणेशमुर्ती खरेदीसाठी शनिवारवाड्याजवळ गर्दी होत असल्याने गुरुवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला होता. याबरोबरच फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मंगला टॉकीज समोरील प्रिमिअर गँरेज लेनमधून शिवाजी रस्ता ते खुडे चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरु होती. 

      मिरवणूक रथांची सजावट पाहून त्याला भरभरुन दाद नागरिकांकडून मिळत होती. फुलांची आकर्षक सजावट, काल्पनिक महाल, विद्युत रोषणाई, पीओपीच्या माध्यमातून विविध आकारातील, रंगाचा सुंदर उपयोग अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मिरवणूक रथाची सजावट केली होती. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाच्या श्रींची मिरवणूक फुलांनी सजविलेल्या रथातून काढण्यात आली. गुरुजी तालीम मंडळ यांच्या श्रींच्या मिरवणूक रथ सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. हुतात्मा बाबु गेनु मंडळ आणि भाऊ रंगारी गणेश मंडळ यांचे मिरवणूक रथ छान सजविण्यात आले होते. अनेक ठिकाणी रांगोळीच्या गालिच्यांनी मिरवणूकीचे मार्ग सजविण्यात आले होते. फुलांची सजावट करुन त्या मार्गावरुन श्रींची मुर्ती नेण्यात आली. दरम्यान शहरात उत्सवाच्या काळात  शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मोठ्या संख्येने पोलीसांचा बंदोबस्त होता. शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस आपली जबाबदारी बजावताना दिसत होते. 

 बँडवाल्यांची क्रेझ कायम डीजे आल्यापासून सणउत्सवापासून लांब गेलेल्या पारंपारिक बँडवाल्यांची क्रेझ अद्याप कायम असल्याचे श्रींच्या मिरवणूकीत पाहवयास मिळाले.  वादनामुळे वेगळा माहोल तयार करणा-या बँडवाल्यांचा उत्साह वाढविण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. लक्ष्मी रस्त्यावरील प्रभात आणि न्यु गंधर्व बँडच्या वादनाने डीजे नव्हे तर आपलाच आवाज  ‘‘कडक’’ असल्याचे यावेळी दाखवून दिले. गणरायाच्या विविध गाण्यांचे अतिशय सुंदर व कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. विशेष म्हणजे यात बँडपथकातील सहभागी वादकांमध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ वादकांची होती. डीजेच्या प्रभावाने मागील काही वर्षांपासून बँडवाल्यांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र मानाच्या गणेशोत्सव मंडळाकडून त्यांना दरवर्षी सहभागी करुन घेतले जात असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवnewsबातम्या