शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

"गणेशोत्सवाचा निर्णय राज्य पातळीवर होईल, पण शक्यतो उत्सवाला मुरड घालणेच योग्य राहील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 18:16 IST

मंदिरे उघडण्याबाबत अजूनही काही निर्णय झाला नाही

ठळक मुद्दे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई, पुण्यातील महत्वाच्या मंडळांशी चर्चा करणार

पुणे : ज्या भागात गर्दी होते. त्याठिकाणी कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणवर होत असतो. असे निर्विवादपणे पुढं आलं आहे. त्यामुळे या काळात आपण आपल्या उत्साहाला मुरड घातली पाहिजे. तरीही गणेशोत्सवाचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर होईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच मंदिरे उघडण्याबाबत अजूनही काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

गणेशोत्सवाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा होत असते. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई, पुण्यातील महत्वाच्या आणि मोठ्या गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करत असतात. असही ते म्हणाले.  सण उत्सव याबाबत बोलताना ते म्हणाले,  कोरोना काळात काही थोडीशी बंधनं पाळली पाहिजेत. त्याला विलाज नाही. हे करावंच लागेल आणि सगळ्यांना ऐकावंच लागेल. साधारणपणे एक गोष्ट लक्षात आलीय की जिते लोकांची गर्दी होते तिथं कोरोनाचा फैलाव वाढतो. उदाहरण घ्यायचं झालं तर पंढरपूर, माळशिरसमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. करमाळा पॉझिटिव्हिटी रेट 9.2, पंढरपूरमध्ये 8.6, माढा 7.7, माळशिरस 7.4 टक्के आहे. 

राज्यातील मंदिरं सुरु होणार का?राज्यातील मंदिर, अन्य धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत काही निर्णय होऊ शकतो का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज्य सरकारच्या स्तरावर निर्णय होईल. जिल्हा पातळीवर अशाप्रकरचा कुठलाही निर्णय होणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यातील मंदिरे, अन्य धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत अद्याप कुठल्याही निर्णयाची शक्यता नसल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

पुण्यातील वीकेंड लॉकडाउनही रद्द करण्यात आला आहे. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. दुकाने , हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ग्रामीण भागात मात्र चार  वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMayorमहापौरganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव