शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

गणेश कला क्रिडा मंच ऐन हंगामात बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:32 PM

सभागृह बंद का आहे याबाबत महापालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापन विभागात चौकशी केली असता तिथे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देगणेश कला क्रिडा मंच सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव तसेच अंदाजपत्रकात तरतुद

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या मालकीचे एकमेव असलेले गणेश कला क्रिडा मंच हे विविध कार्यक्रमांसाठीचे सभागृह महापालिकेने बंद ठेवले आहे. संपुर्ण नुतनीकरणाची गरज असताना तिथे किरकोळ कामे केली जात आहेत. त्याचेही नियोजन नसल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात सभागृह बंद असल्याने जाहीर कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांची अडचण होत आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे महापालिका लक्ष द्यायला तयार नाही.व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठीची अनेक नाट्यगृहे शहरात आहेत. मात्र शाळा तसेच संस्था, संघटना यांना लागणारे मोठे सभागृह शहरात नव्हते. तसेच ही मोठी सभागृहे कायमच बूक असल्याने, त्याचे भाडे जास्त असल्याने संस्था, संघटना यांना परवडतही नाही. त्यासाठीच महापालिकेने गणेश कला क्रिडा मंच तयार केले आहे. आता या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.माजी आमदार मोहन जोशी या सभागृहाच्या दुरावस्थेकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधत असतात. हे मध्यवर्ती सभागृह संपुर्ण वातानुकूलित करावे अशी मागणी त्यांनी नुकतीच आयुक्तांकडे केली आहे. सध्या या सभागृहात वॉटर कुलींग यंत्रणा आहे. त्याचा आवाज होऊन सुरू असलेल्या कार्यक्रमांचा रसभंग होतो. यंत्रणा बंद ठेवली तर उष्मा वाढतो. अशा स्थितीत महापालिकेने सभागृह वातानुकुलित करावे असे जोशी यांनी सुचवले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने काही वर्षांपूर्वी तसा ठराव केला. मात्र, प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही असे जोशी यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी आयुक्तांना कळवले आहे.सभागृह बंद का आहे याबाबत महापालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापन विभागात चौकशी केली असता तिथे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सभागृहातील आसने खराब झाली आहे. त्यांची रचना जुनी आहेत. तिथे नव्या आधुनिक रचनेची करण्याची गरज आहे. फ्लोअरिंग जुने झाले आहे. स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आहे. त्यांची संख्या वाढवण्याची व सुधारणा करण्याची गरज आहे. ही कामे सोडून तिथे अत्यंत किरकोळ कामे सुरू आहेत व त्यासाठी म्हणून सभागृह बंद ठेवण्यात आले आहे. जोशी यांनी सांगितले, शहराच्या मध्यवर्ती भागात हे एकमेव सभागृह आहे. त्यामुळे त्याचा वापर शाळांच्या स्नेहसंमेलनांसाठी, विविध संस्था, संघटनांच्या सांस्कृितक कार्यक्रमांसाठी होत असतो.

.......................................

गणेश कला क्रिडा मंच सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. तसेच अंदाजपत्रकात तरतुद केली आहे. त्यानुसार कामे करण्यात येतात. सध्या रंगमंचावर करावी लागणारी काही आवश्यक कामे केली जात आहेत. त्यामुळे सभागृह बंद ठेवण्यात आले आहे. आणखी काही दिवसांनी ते सुरू करण्यात येईल. नुतनीकरणाच्या प्रस्तावात सगळ्या बदलांची माहिती दिली आहे. तो प्रस्ताव मान्य होऊन अपेक्षित तरतुद करण्याती आली तर नुतनीकरणही करण्यात येईल असे अमराळे यांनी सांगितले. प्रकाश अमराळे, महापालिका नाट्यगृह व्यवस्थापन विभागाचे प्रमुख

टॅग्स :PuneपुणेGanesh Kala-Krida Manchगणेश कला-क्रीडा मंच