गणेशोत्सव ही सामाजिक परंपरा : मुक्ता टिळक, कृतज्ञता सेवा पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:37 PM2017-11-06T15:37:18+5:302017-11-06T15:47:26+5:30

गणेशोत्सव मंडळाचे हे सामाजिक योगदान मोठे आहे. त्यामुळे गणेशोत्सव ही एक सामाजिक परंपरा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. 

Ganesh festival is a social tradition: Mukta Tilak | गणेशोत्सव ही सामाजिक परंपरा : मुक्ता टिळक, कृतज्ञता सेवा पुरस्काराचे वितरण

गणेशोत्सव ही सामाजिक परंपरा : मुक्ता टिळक, कृतज्ञता सेवा पुरस्काराचे वितरण

Next

पुणे : पुण्यात दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु विसर्जन मिरवणूक झाली की सर्व कार्यकर्ते थेट पुढच्या गणेशोत्सवातच एकत्र येतात. परंतु, काही गणेशोत्सव मंडळे वर्षभर समाजासाठी काम करत असतात. त्यामुळे समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचते. गणेशोत्सव मंडळाचे हे सामाजिक योगदान मोठे आहे. त्यामुळे गणेशोत्सव ही एक सामाजिक परंपरा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. 
अकरा मारुती चौक गणेशोत्सव मंडळ, सत्येश्वर मित्र मंडळ, राष्ट्रीय कला अकादमी न्यास यांच्या वतीने विनायक महादेव रेणुसे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सेवा पुरस्कार टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष विनायक घाटे, वैभव रेणुसे, संकेत जाधव, मिलिंद घाटे, कौस्तुभ वैद्य, ऋषी घाटे, सिद्धेश घाटे, प्रथमेश घाटे आदी यावेळी उपस्थित होते. 
लुई ब्रेल अंध अपंग कल्याणाकारी संस्थेच्या नूतन केंद्रे आणि वंचित विकास संस्थेच्या आरती तरटे यांना कृतज्ञता सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या कोटणीस दवाखान्यातील महिला कर्मचारी आणि पुरुष सेवार्थींचा सन्मान यावेळी करण्यात आला. 
आनंद सराफ म्हणाले, ‘समाजासाठी झटणारे अनेक हात आहेत. त्यांची दखल घेऊन सन्मानित करणे ही एक सेवाच आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दवाखाने या ठिकाणी काम करताना कर्मचारी आपले कुटुंब मागे ठेवून सेवाभावाने आपले कर्तव्य निभावत असतात. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.’

शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Ganesh festival is a social tradition: Mukta Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.