शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

गजानन मारणे व ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; जंगी मिरवणूक प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 20:27 IST

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे ३०० गाडयांसह मिरवणुक काढली होती.

ठळक मुद्देहिंजवडी पोलीस ठाण्यातील मिरवणूक प्रकरणाचा गुन्हा

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंजवडीपोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला.

गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय ३४), गणेश नामदेव हुंडारे (३९), सचिन अप्पा ताकवले (वय ३२), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४) आणि अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७) यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तर मेहबूब मोर्तुजा महम्मद सय्यद (वय ३३), राजशेखर यलप्पा बासगे (वय २६), जयवर्धन जयपाल बिरनाळे (वय २४), लक्ष्मण एकनाथ आल्हाट (वय ४०), सुनील ज्ञानोबा कांबळे (वय ३१), आशिष बापूराव पिसाळ (वय २२) आणि इतर १५० समर्थकांवर गुन्हा दाखल आहे.

गजानन मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड, वारजे, हिंजवडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांपैकी हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे ३०० गाडयांसह मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीचे चित्रीकरण करुन ते सोशल मिडियावर व्हायरल करुन समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मारणे व त्याच्या साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाही. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

आजपर्यंत पोलिसांनी केलेला तपासमिरवणुकीत वापरलेली ११ वाहने निष्पन्न झाली आहेत

रॅलीचे उर्से व पुणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे८ साक्षीदारांकडे तपास करून त्याचे जबाब नोंदवले आहेतआरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथकांची नेमणूकव्हायरल फोटो आणि व्हिडिओची माहिती मिळवण्यात येत आहे

आरोपींवर दाखल गुन्हे

गजानन मारणे- २३रूपेश मारणे- १२सुनील बनसोडे - १४

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटकhinjawadiहिंजवडी