गायकवाड विद्यालयातील उपक्रम कौतुकास्पद : धारिवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST2021-06-17T04:08:45+5:302021-06-17T04:08:45+5:30

कासारी येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय व आर. एम. धारिवाल ज्युनियर व सिनियर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत ...

Gaikwad Vidyalaya's activities are commendable: Dhariwal | गायकवाड विद्यालयातील उपक्रम कौतुकास्पद : धारिवाल

गायकवाड विद्यालयातील उपक्रम कौतुकास्पद : धारिवाल

कासारी येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय व आर. एम. धारिवाल ज्युनियर व सिनियर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजिका शोभाताई धारिवाल यांनी केले.

कासारी (ता. शिरूर) येथील सौ. हिराबाई गायकवाड विद्यालय व आर. एम. धारिवाल ज्युनियर व सिनियर अकॅडमीला शोभाताई धारिवाल यांनी भेट दिली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. धारिवाल यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, सरपंच सुनीता भुजबळ, उपसरपंच दिलीप भुजबळ, संतोष नवले, विद्यालयाचे प्राचार्य अशोक सरोदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. राजेंद्र ढमढेरे यांनी शोभाताई धारिवाल यांचा वृक्ष देऊन सन्मान केला.

Web Title: Gaikwad Vidyalaya's activities are commendable: Dhariwal