G-20 Summit: परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे - चंद्रकांत पाटील

By नितीश गोवंडे | Published: June 17, 2023 05:11 PM2023-06-17T17:11:00+5:302023-06-17T17:15:34+5:30

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असेही पाटील यांनी सांगितले...

G-20 Summit chandrakant patil security of foreign delegates coming should be taken very seriously | G-20 Summit: परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे - चंद्रकांत पाटील

G-20 Summit: परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे - चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे : जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन आणि येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेसंदर्भात पुणे पोलिस आयुक्तालयात बैठतकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षेसंदर्भात अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना पोलिस आयुक्तांना केल्या आहेत.

जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, विद्यार्थी शाळेच्या बसेसने येणार असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असेही पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवी शिंगणापूरकर आणि शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षाविषयक समन्वयासाठी कमांड सेंटरची स्थापना करण्यात आली असून वाहतूक नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑनलाइन सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना भेटीची पूर्वनियोजित वेळ देण्यात येत असून एकाच वेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: G-20 Summit chandrakant patil security of foreign delegates coming should be taken very seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.