शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभारावर रोष

By admin | Updated: July 1, 2015 23:49 IST

चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी : चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. या विषयास ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ‘ग्राहकांना भरमसाठ वीजबिलाचा शॉक’ या शीर्षकाखाली लोकमतने बुुधवारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले. मीटरचे छायाचित्र न घेताच अंदाजे सरासरी रीडिंग टाकून बिल पाठविण्याचा प्रकार शहरातील सर्वच भागांत वाढला आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तडजोड केल्याचे दाखवीत रक्कम थोडी फार कमी केली जाते. मात्र, पुढील बिलात पुन्हा ही रक्कम वाढून येते. पुन्हा तक्रार करीत वेगवेगळी कार्यालये पालथी घालावी लागतात. यात वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. काहींना मुदतीनंतर बिले पाठविली जातात. त्यामुळे वाढीव बिलासोबत दंडाची रक्कमही भरावी लागते. हा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामध्ये नागरिकांची काहीच चूक नसते. या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापारी, लघुउद्योजक यांच्या तक्रारी आहेत. वीजजोड खंडित कारवाईमुळे अंधारात राहण्याची वेळ येईल म्हणून नाईलाजास्तव अनेक जण निमूटपणे बिल भरून मोकळे होतात. मात्र, वीज कंपनीच्या कामकाजात सुधारणा होताना दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अधिक रक्कम भरावी लागत आहे. पिंपळे गुरव येथील चक्रनारायण नाथन यांनी अधिक रीडिंगचे बिल येत असल्याची तक्रार पिंपरी विभागीय कार्यालयात केली. मीटर तपासा किंवा तो बदलून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. मीटरची तपासणी करून रीडिंग चुकीचे येत असल्यास ते बदलून दिले जाणार असल्याचे पिंपरीचे कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ तीनच तक्रारीपिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत एकूण २ लाख ८६ हजार, तर भोसरी विभागीय कार्यालयांतर्गत एक लाख ८० हजार ग्राहक आहेत. पिंपरीत केवळ ३ तक्रारी आल्या. भोसरीत तर एकही तक्रार आली नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन घेण्यात येतो. पिंपरी कार्यालयात वाढीव वीज बिल आले असून, मीटर बदलून द्यावा,अशी एक तक्रार पिंपळे गुरव येथील रहिवाशाने केली. तीन दिवसांसाठी तात्पुरता वीजजोड घेतला होता. त्यासाठी भरलेली सुरक्षा ठेव परत करावी, अशी तक्रार जाधव कॉलनी, पिंपरीतील एकाने केली. ही ठेव गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भरली होती. घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना भाडेकरूस वीजजोड दिल्याची तक्रार दापोडीतील एका रहिवाशाने केली. या संदर्भात बिलिंग विभागाचे श्रीकृष्ण बागे आणि तांत्रिक विभागाचे एस. एम. क्षीरसागर यांनी तक्रारी स्वीकारल्या. तक्रारींवर त्वरित तोडगा काढण्याचा सूचना कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी दिल्या आहेत. भोसरीत एकही तक्रार आली नाही, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांनी दिली. नियमितपणे तक्रारी येतात. फोनवरही तक्रारी घेतल्या जातात. अधिकारी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्वरित कारवाई होऊन नागरिकांचे समाधान केले जाते. त्यामुळे तक्रार निवारण दिनाची कोणी वाट बघत बसत नाही. पाच वर्षांपूर्वी १० ते २० तक्रारी या दिवशी येत. सध्या ही संख्या नाही इतकी आहे. गेल्या महिन्यातही एकही तक्रार आली नाही, असे भरणे यांनी सांगितले.