शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नीरेत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, एक कोटी रुपयांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:01 PM

पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर नीरा नजीक पिंपरे खुर्द हद्दीत फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत  दुकानातील एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देलग्नसराई सुरू झाल्याने दुकानात भरपुर प्रमाणात नवीन माल

नीरेत फर्निचरच्या दुकानाला आग, एक कोटी रुपयांचे नुकसान नीरा : पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर नीरा नजीक पिंपरे खुर्द हद्दीत फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत  दुकानातील एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जेजुरी, सोमेश्वर व नीरेतील अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग नियंत्रणात येण्यापूर्वीच दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.  या नीरेतील  सचिन बर्गे, रवींद्र धायगुडे व संतोष वाघमारे या तीन युवकांनी नुकतेच सचिन फर्निचर व लक्ष्मी स्टील सेंटर नावाचे दुकान चालु केले होते. लग्नसराई सुरू झाल्याने दुकानात नवीन माल भरपुर प्रमाणात भरला होता. रात्री एकच्या दरम्यान दुकानातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आग लागल्याचे रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ शिवाजी चौकातील चहा विक्रेते नितीन अग्रवाल यांना माहिती दिली त्यांनी प्रथम पोलिस दुरक्षेत्राशी संपर्क साधला. नीरेतील तसेच पिंपरे खुर्द येथील युवकांनी ज्युबिलंट कंपनी, सोमेश्वर कारखाना तसेच जेजुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांना कल्पना दिली. तीन आगीच्या बंबांनी सात टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. परंतु,आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व लाकडी फर्निचर, फ्रिज, मिक्सर, ओव्हन, कपाटे, कुलर, टेबल खुर्ची, मोठ्या प्रमाणावर स्टिल, तांब्या पितळेची भांडी असे सुमारे एक कोटी रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाले आहे. तसेच दुकानाचे देखील सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Purandarपुरंदरfireआग