शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सोपानमहाराज नामदास अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:42 IST

सासवड दिवे घाटात अपघाती निधन 

आळंदी : संत नामदेवरायांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे सासवड दिवे घाटात अपघाती निधन मंगळवारी (दि.१९) झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली. अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, महंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोपानमहाराज नामदास यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिवावर इंद्रायणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आळंदीवर शोककळा पसरली. राज्यातून आलेले भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तत्पूर्वी सोपानमहाराज नामदास यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विष्णू मंदिर येथे ठेवण्यात आले होते. अंत्यविधी पूर्वी मंदिर व ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. यावेळी नागरिक, भाविकांनी दर्शनास गर्दी केली. त्यांचे पार्थिवावर येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकुल वातावरणात भाविक, वारकरी यांचे उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आमदार संजय जगताप, माजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी आमदार प्रकाश देवळे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, वारकरी फडकरी संघटनेचे माऊली महाराज जळगावकर, धोंडोपंतबाबा शिरवळकर, बाळासाहेब महाराज उखळीकर, राणू महाराज वासकर, नीलेश महाराज लोंढे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, बाळासाहेब महाराज शेवाळे, नरहरी महाराज चौधरी, रामभाऊ महाराज राऊत, संजयमहाराज घुंडरे, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मारुती महाराज कुरेकर, तात्या महाराज कराडकर, मारुती महाराज कोकाटे, आळंदीतील वारकरी, भाविक, नामदेवरायांचे दिंडीतील मान्यवर, नामदास परिवार, शिष्य, गायक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदेवरायांचे वंशज नामदास परिवार असून या परिवाराकडून आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी प्रसंगी कीर्तन सेवेची परंपरा आहे. सेवेसाठी तसेच आळंदी यात्रेला येण्यासाठी दिंडीचा प्रवास सुरू होता. नामदेवरायांची दिंडी आळंदीला येत असताना दिंडीला अपघात झाला. सोपानमहाराज नामदास (वय ३६) हे  वै. तुळशीदास महाराज नामदास यांचे चिरंजीव आहेत. ते संत नामदासमहाराज यांचे १७ वे वंशज असून ते बालपणापासून आळंदी वारीला येत आहेत. ते कीर्तन सेवेत नेहमी टाळाची सेवा देत असत. ते विवाहित असून केशव महाराज नामदास यांचे ते पुतणे होत. 

टॅग्स :AlandiआळंदीAccidentअपघातDeathमृत्यू