शेतकरी सुभाष जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST2021-08-24T04:14:39+5:302021-08-24T04:14:39+5:30

आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान ...

Funeral on farmer Subhash Jadhav | शेतकरी सुभाष जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

शेतकरी सुभाष जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सकाळी जाधव यांच्यावर जाधववाडी येथील त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. जाधव कुटुंबीयांची निवासस्थानी भेट घेऊन मुलगा गणेश जाधव, मुलगी प्रतीक्षा ढोमे व कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेला दोषी असलेल्यांवर कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कायदेशीर चौकशी करून जाधव कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ, दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देवदत्त निकम व विवेक वळसे पाटील यांनी यावेळी दिली. या वेळी जाधववाडीचे सरपंच अंकुश थोरात, माजी सरपंच रामदास जाधव, मंगेश जाधव, दत्तात्रय जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Funeral on farmer Subhash Jadhav