पश्चिम बंगाल येथील खुन प्रकरणातील फरारी आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST2021-03-09T04:13:50+5:302021-03-09T04:13:50+5:30
राकेश कुमार शत्रुघ्न सिंग (वय २९, रा. कृष्णापुरी चुटिया, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम ...

पश्चिम बंगाल येथील खुन प्रकरणातील फरारी आरोपीला अटक
राकेश कुमार शत्रुघ्न सिंग (वय २९, रा. कृष्णापुरी चुटिया, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगालच्या राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय खान यांनी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली होती. जोगिंदर सिंग यांचा मुलगा तेजपाल सिंग याचे काहींनी अपहरण केले होते. या गुन्ह्यातील एक आरोपी राकेश कुमार शत्रुघ्न सिंग हा पुणे ग्रामीण हद्दीत लोणीकंद येथे राहत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या बाबत कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणीकंद भागात या आरोपीचा शोध घेत असताना एक व्यक्ती संशयीत आढळला. त्याने त्याचे नाव करण सिंग असल्याचे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता त्यावर देखील करण सिंग हे नाव असल्याचे आढळून आले. तो खोटी माहिती देत असल्यांचा संशय आल्याने पोलिसीखाक्या दाखवताच त्याने खरी माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून तो नाव बदलून बनावट कागदपत्रे बनवून पुण्यात राहत असल्याचे सांगितले. त्याचे नाव राकेश कुमार शत्रुघ्न सिंग असल्याचे त्याने सांगितले. त्यास ताब्यात घेऊन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पश्चिम बंगाल शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर खान यांच्या ताब्यात दिले आहे.
फोटो मजकूर - पश्चिम बंगाल मधील खून आणि अपहरण प्रकरणातील फरारी आरोपी व पोलीस पथक .