शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

FTII: 'तो मेडिटेशनही करायचा...' आत्महत्या केलेल्या अश्विन शुक्लाच्या सहकाऱ्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:50 IST

आम्हाला सर्वांनाच धक्का बसलाय...

पुणे : अश्विनचा खांदा निखळल्याने त्याला थोडा त्रास व्हायचा. त्यासाठी तो मेडिटेशन करायचा. औषधाने त्याला झोप लागायची. त्यामुळे त्याला फारसे कुणी डिस्टर्ब करायचे नाही. पण तो असे काही करेल असेकुणालाच वाटले नाही. आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे, असे एफटीआयआयमधील आत्महत्या केलेल्या अश्विन शुक्लाच्या सहकारी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अश्विन सिनेमँटोग्राफीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. डिप्लोमाची तो तयारी करीत होता. त्याचे कॅमेऱ्याचे तांत्रिक ज्ञान जबरदस्त होते. त्याचं वाचन उत्तम होते. एकटाच अनेकवेळा रूमवर वाचन करीत बसायचा. एकदम चांगला व्यक्ती होता. त्याचे कुणाशी कधी वाद नव्हते. दोन आठवड्यांपूर्वी मास्टर क्लास झाला. त्यात तो सहभागी झाला होता. 29 जुलैला शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे थेअरी शिक्षण संंपले. आता आमचे सप्टेंबरमध्ये डिप्लोमा सुरु होणार आहेत. त्याच्या बैठका सुरु होत्या. अश्विनचे डिप्लोमासाठी नियोजन सुरु होते...हे सांगताना त्याचा सहकारी भावूक झाला होता. एका मित्राने अश्विनच्या रूमची कडी ठोठावली होती. पण त्याने दरवाजा उघडला नसल्याचे तो म्हणाला.

दोन दिवसांपूर्वी व्हिसडमट्री येथे रात्री झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण भेटले होते. त्या पार्टीलाही तो उपस्थित होता. त्याने आत्महत्या केल्याचे  ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याला नैराश्य आले असल्याची कोणतीच लक्षणे त्याच्यात दिसत नव्हती. असं काय घडल की त्याने हे पाऊल उचलले ते कळेनासे झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर त्याचे पार्थिव ससूनला शवविच्छेदनासाठी नेले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये कारण समजू शकेल.

- सईद रब्बीहाश्मी, कुलसचिव, एफटीआयआय

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयgoaगोवाCrime Newsगुन्हेगारी