शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआय : सक्तीच्या रजेला स्थगिती

By admin | Updated: September 2, 2015 04:20 IST

एफटीआयआयच्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाला स्थगिती देत, संचालक प्रशांत पाठराबे यांनी एक महिन्याची मुदतवाढ देऊन

पुणे : एफटीआयआयच्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाला स्थगिती देत, संचालक प्रशांत पाठराबे यांनी एक महिन्याची मुदतवाढ देऊन मंगळवारी कर्मचाऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा दिला. तब्बल ८३ दिवस सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनावर दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत तोडगा निघेल, अशी आशाही संचालकांनी व्यक्त केली. दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशी संचालकांकडूनच गोड गिफ्ट मिळाल्याने विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी जल्लोष करून संस्थेचा परिसर दणाणून सोडला. कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जाऊ नये, त्यांना कामावर परत घेण्यात यावे, यासाठी दुसऱ्या वर्षाचा सतीशकुमार हा विद्यार्थी मंगळवारी एक दिवसाकरिता उपोषणाला बसला होता, त्याची दखल घेत संचालकांनी हा निर्णय मंगळवारी सायंकाळी जाहीर केला. या आंदोलनामुळे संस्थेमधील सर्व कामकाज ठप्प झाले असून, येथील कर्मचाऱ्यांच्या हातात कोणतेच काम नाही, असा बागुलबुवा करीत संचालक प्रशांत पाठराबे यांनी दि. १ सप्टेंबरपासून लाइट, साऊंड विभागासह कार्पेंटर, पेंटर आदी तंत्रज्ञ कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारपासून ८२ कर्मचारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. शासनाने दबावतंत्राचा वापर करीत, हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे, आपल्यामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, किमान या भावनेपोटी का होईना विद्यार्थी आंदोलनाचे उगारलेले शस्त्र मागे घेतील, असा कुटील डाव शासनाचा असल्याचा आरोप स्टुडंट असोसिएशनने केला होता. आज पत्रकार परिषदेतही त्यांनी याचाच पुनरुच्चार केला. गेली ३० वर्षे संस्थेच्या साऊंड विभागात कार्य करणाऱ्या नितीन पत्की यांनी सांयकाळी संचालकांची भेट घेतली. तेव्हा कर्मचाऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली असल्याचे स्वत: संचालकांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले. संचालकांनीदेखील पत्रक काढून आपला निर्णय जाहीर केला. त्यामध्ये म्हटल्यानुसार, संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग, प्रोजेक्टसची कामे ठप्प होती, कर्मचाऱ्यांना काहीच काम नव्हते. आंदोलनामुळे सर्व कामे बंद होती. संचालक म्हणून मी विद्यार्थ्यांच्या विरोधात नाही; पण आॅडिटमध्ये अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र, अशी परिस्थिती निर्माण झाली, की विद्यार्थी उपोषणाला बसला आणि मग मला हस्तक्षेप करण्यास भाग पडले. म्हणूनच विद्यार्थी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना भेटून या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी मी प्रयत्न करेन, असे त्यांना सांगितले. यासंदर्भात मंत्रालयाशी चर्चादेखील केली. या आंदोलनावर महिनाभरात काहीतरी तोडगा निघू शकेल, असे वाटले म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा मी निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.