शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्यांची आवक कमी, तरीही भाव कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही भावात घसरण ...

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही भावात घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक बाजारभाव स्थिर राहिले. भुईमूग शेंगांची आवक कमी झाल्याने भाव घसरले. लसणाची आवक कमी झाल्याने बाजारभाव गडगडले. गाजर व वाटण्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.कोबी,फ्लॉवर,टोमॅटो,भेंडी,कारली,काकडी,दुधी भोपळा,दोडका या फळभाज्यांची आवक कमी होऊनही बाजारभावात घट झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व शेपू भाजीची आवक कमी झाली तर कोथिंबीर भाजीची आवक वाढल्याने भाव घसरले. जनावरांच्या बाजारात म्हैस व बैलांच्या संख्येत वाढ झाली,तर जर्शी गाय व शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत घट झाली.एकूण उलाढाल ३ कोटी ९० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५,००० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कांद्याच्या भावात १०० रुपयांची घसरण झाली.कांद्याचा बाजारभाव २,५०० रुपयांवरून २,४०० रुपयांवर घसरले.

तळेगाव बटाट्याची एकूण १०५० आवक क्विंटल झाली.मागील शनिवारच्या तुलनेत ही आवक व बाजारभाव स्थिर राहिले. बटाट्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक ७ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत ही आवक १ क्विंटलने घटल्याने बाजारभाव ६,५०० रुपयांवर स्थिरावले.भुईमुग शेंगांची १५ क्विंटल आवक होऊनही भाव ७,००० स्थिरावले.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २३२ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला २,००० ते ३,००० रुपये असा भाव मिळाला

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा - एकूण आवक - ५,००० क्विंटल. भाव क्रमांक १. २,४०० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,८०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १,०५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

फळभाज्या -

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - ५९ पेट्या ( ५०० ते ९०० रू. ), कोबी - १३४ पोती ( १०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - १४२ पोती ( ८०० ते १,४०० रु.),वांगी - ६२ पोती ( ६०० ते १,२०० रु.). भेंडी - ५२ पोती ( २,००० ते ३,००० रु.),दोडका - ३६ पोती ( २,००० ते ३,००० रु.). कारली - ४६ डाग ( २,००० ते ३,००० रु.). दुधीभोपळा - ३२ पोती ( ५०० ते १,००० रु.),काकडी - ३७ पोती ( ६०० ते १,२०० रु.). फरशी - २६ पोती ( २,००० ते ३,००० रु.). वालवड - २९ पोती ( २,००० ते ४,००० रु.). गवार - १६ पोती ( ३,००० ते ५,००० रू.), ढोबळी मिरची - ५३ डाग ( १,५०० ते २,५०० रु.). चवळी - १६ पोती ( २,५००) ते ३,५०० रुपये ), वाटाणा - ३८० पोती ( २,२०० ते २,८०० रुपये ), शेवगा - १९ पोती ( २,००० ते ४,००० रुपये ), गाजर - १४७ पोती ( ६०० ते १,००० रु.).

पालेभाज्या –

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख २५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ७०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ८० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २०० ते ७०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण ३४ हजार ६५० जुड्या ( २०० ते ४०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २९ हजार ६५० जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), शेपू - एकुण ३ हजार २६० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), पालक - एकूण ४ हजार ६५० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).

जनावरे -

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५ जर्शी गायींपैकी ५२ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रुपये ), १३५ बैलांपैकी ८५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १६५ म्हशींपैकी ११५ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९,३४५ शेळ्या - मेंढ्यापैकी ८९८० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.

फोटो - चाकण बाजार