शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

'एफआरपीमुळे दूध उत्पादक वेठबिगार होतील', शेतकरी संघटनेच्या रघूनाथदादा पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:08 IST

दूध उत्पादकाला कमीत कमी मोबादला देऊन लुटण्याचा हा प्रकार...

-रविकिरण सासवडेबारामती : दुधाला एफआरपी लागू केल्यास ऊस कारखानदारीेची जी सध्याची अवस्था आहे तशीच अवस्था दूध धंद्याची भविष्यात होईल. केवळ नफा कमवण्यासाठी  दूध उत्पादकाला एफआरपीचे गाजर दाखवून दूध संस्थांच्या दावणीला बांधले जाईल. दूध उत्पादकाला कमीत कमी मोबादला देऊन त्यांना लुटण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दांत राज्य सरकारच्या दूध एफआरपी उपसमितीच्या निवडीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे.

दराच्या प्रश्नांवरून राज्य सरकारने दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमली आहे. एफआरपीच्या या मुद्द्यावर शेतकरी संघटनांनी मात्र आक्षेप घेतला आहे. एफआरपी ऐवजी आरएसएफ (Revenue share factor, महसुली उत्पन्नातील वाटणी) प्रमाणे दुधाला दर द्यावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, शेतकऱ्यांनी एफआरपी (उचीत आणि लाभदायक किंमत) याला विरोध करायला हवा. ऊस कारखानदारीतील नफेखोरीप्रमाणेच दुध संस्था सुद्धा यामुळे नफेखोरी करू लागतील. कायदेशीरबाबींप्रमाणे आरएसएफ प्रमाणे दूध उत्पदाकचा उत्पन्नातील वाटा ठरला पाहिजे. दूध आणि दुधापासून जे फस्ट प्रॉडक्ट तयार होतात त्यातील ७० टक्के रक्कम ही कच्च्या उत्पादकाला मिळायला हवी. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये दूध संस्थांनी भागवले पाहिजे.

एफआरपीच्या चर्चेमुळे जी परिस्थिती ऊस शेतीची झाली आहे. तिच परिस्थिती दूध धंद्याची होण्याची शक्यता आहे. आरएसएफनुसार दुधाचा दर बाजारातील किंमतीप्रमाणे ठरवणे गरजेचे आहे. ग्राहक ६० रूपये लिटरने दूध विकत घेत आहे. याठिकाणी ७०/३० सुत्र लागू करणे गरजचे आहे. यातील ४२ रूपये प्रतिलिटर दर हा दूध उत्पादकाला मिळायली हवा. तर उर्वरित १८ रूपयांमध्ये दूध संस्थांनी लिटर मागचा खर्च भागवावा. सी रंगराजन समितीच्या अहवालामध्ये देखील ७०/३० चे सुत्र आहे. यानुसार दर दिला तरच दूध धंदा टिकून राहिल अन्यथा ग्राहकाला निकृष्ठ दर्जाचे दूध खावे लागेल. निकृष्ठ दुधामुळे भविष्यात मोठ्या रोगराईचा सामना करावा लागू शकतो.एफआरपी लागू केल्यास दूधधंद्याचा उकिरडा होईल : पांडुरंग रायतेऊसाला एफआरपी लागू केली. त्यानंतर बहूतांश कारखाने  ऊसाची एफआरपी कमी देण्यासाठी  रिकव्हरी चोरायला लागले. ऊस कारखानदारीमधील सव्वातीन टक्के रिकव्हरी राज्य शासनाने नियम करून चोरली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला प्रतिटन १ हजार रूपयांचा तोटा झाला. दुधाला एफआरपी लागू केल्यास भविष्यात दुधाचे फॅट व एसएनएफ चा रेषो बदल केला जाईल. या रेषोमुळे दूध उत्पादकाला कसे कमीत कमी पैसे दिले याची काळजी दूध संस्था घेतील हा खुप मोठा धोका आहे.- पांडुरंग रायतेजिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmilkदूधBaramatiबारामती