शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिली फ्रेंडचं घृणास्पद कृत्य; मित्राच्या मुलीला ६ वर्षापासून ब्लॅकमेल करत केला अत्याचार;गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:08 IST

आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला.

पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.अधिकच्या माहितीनुसार, २०१९ साली फिर्यादी जेव्हा केवळ १९ वर्षांची होती, तेव्हापासून हा अत्याचार सुरू झाला. आरोपी व फिर्यादीचं कुटुंब परस्परांच्या चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ये-जा करायचा. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला.दरम्यान, २०१९ पासून २०२५ पर्यंत या काळात अनेकदा धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केले. घरात कोणी नसताना किंवा फिरताना, चारचाकीतून प्रवास करताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. २०२० ते जुलै २०२५ दरम्यान आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या नराधमाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. रोज घरात वावरणाऱ्या व्यक्तीचं हे घृणास्पद वर्तन ऐकून कुटुंबीय स्तब्ध झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध  लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र